समूहनृत्य स्पर्धेत माळेवाडी (अ) जिल्हा परिषद शाळेचा तालुक्यात द्वितीय क्रमांक
भूमीपुत्र न्यूज /केदार लोहकरे
माळशिरस तालुकास्तरीय समूहनृत्य स्पर्धा नुकत्याच अकलूज येथील जिल्हा परिषद शाळेत संपन्न झाल्या.या स्पर्धेत तालुक्यातील सर्व केंद्राचे संघ सहभागी झाले होते.यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळेवाडी ,अकलूज या संघाने उत्कृष्ट सादरीकरण करून माळशिरस तालुक्यात मोठ्या गटात व्दितीय क्रमांक मिळविला.या संघाला मुख्याध्यापक शिवलिंग नकाते यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धा पार पाडण्यासाठी अकलूज केंद्राचे केंद्रप्रमुख राजेंद्र जाधव व शाळेतील सर्व शिक्षक यांनी परिश्रम घेतले. लोकनृत्य स्पर्धेसाठी परीक्षक प्रशांत सरवदे (माळीनगर) अजिंक्य नवगिरे (अकलूज) विष्णू राजगुरू (अकलूज) यांनी काम पाहिले.
शिक्षिका प्रतिभा गोडसे, स्मिता कापसे,ललितागौरी राणे,सुषमा राऊत,विद्या नवले, मनिषा पांढरे,दिलीप वाघमारे, सुरय्या कोरबू,तरन्नुम सय्यद, पद्मश्री थिगळे,विजय अस्वरे यांचे सहकार्य लाभले. गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख,वेळापूर बीटच्या विस्तारधिकारी सायरा मुलाणी,यशवंतनगर केंद्राचे केंद्रप्रमुख विठ्ठल नष्टे,शाळेचे मुख्याध्यापक शिवलिंग नकाते,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य यांनी अभिनंदन केले.