ओरिगामी कार्यातून कौशल्यांचा शोध व विकास प्राथमिक शाळेत कार्य शाळेचे आयोजन
भूमीपुत्र न्यूज
विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास व्हावा,विद्यार्थी मानसिक व शारीरिकदृष्ट्या सबल असावा या हेतूने शाळेत निरनिराळे उपक्रम राबविले जातात.जि.प.प्राथ.शाळा,शेटफळ ता.मोहोळ येथे इ.पहिली ते चौथी मधील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीचा अनुभव मिळावा म्हणून एकदिवसीय क्राफ्टकृती अर्थात ओरिगामीवर आधारित कार्यशाळेचे नुकतेच आयोजन करणेत आले होते.
याप्रसंगी ओरिगामी म्हणजे काय हे सांगून याद्वारे निरनिराळे प्राणी,पक्षी,मासे,वस्तू,फुले कशा पध्दतीने बनवता येतात याचे मार्गदर्शन शाळेतील शिक्षक रविंद्र देबडवार यांनी केले.
या कार्यशाळेला मुलांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.पुढील वर्षभर हा उपक्रम राबविणार व निर्मिती झालेल्या साहित्याचे प्रदर्शन भरविणारअसल्याची माहिती शिक्षकांनी यावेळी दिली.
या उपक्रमाचे स्वागत व कौतुक सर्व स्तरातून होत आहे.या कार्यशाळेचे उद्घाटन मुख्याध्यापिका संगिता पाटील यांचे शुभहस्ते झाले.शिक्षक विठ्ठल पवार यांनी मनोगत व्यक्त केले.शाळेतील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.आभाराने कार्यशाळेची सांगता झाली.