निमगावचे सुपुत्र नागेश मगर यांना पीएचडी प्रदान
भूमीपुत्र न्यूज
अकलूज येथील शिवरत्न शिक्षण संस्था संचलित शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या महाविद्यालयातील प्राध्यापक नागेश मगर यांना कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापिठाकडून पी.एचडी ही पदवी बहाल करण्यात आली. मगर यांनी पश्चिम महाराष्ट्रातील व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांवर होणाऱ्या समाजमाध्यमांच्या परिणामांच्या प्रायोगिक अभ्यास या विषयावर विद्यापीठात प्रबंध सादर केला होता.
वाणिज्य व व्यवस्थापन विभागाचे प्रमुख डॉ. आण्णासाहेब गुरव यांच्या अध्यक्षतेखाली वाणिज्य विभागातील प्राध्यापक व संशोधक विद्यार्थ्यांच्या उपस्थित प्रबंदाची पडताळणी होऊन मुक्त मौखिक परीक्षा पार पडली. या वेळी बेळगाव (कर्नाटक) येथील चेतन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचे प्रोफेसर डॉ. रमाकांत कुलकर्णी यांनी बहिस्थ परीक्षक म्हणून काम पाहिले. संशोधन प्रबंध पूर्ण करण्यासाठी प्रा. मगर यांना शिवाजी विद्यापीठाच्या मॅनेजमेंट स्टडीज विभागातील प्रोफेसर डॉ. एन. सी. माळी यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा. मगर यांच्या या यश संपादनामुळे संस्थेचे अध्यक्षा शितल देवी मोहिते- पाटील, कार्याध्यक्ष धैर्यशील मोहिते-पाटील, ज्येष्ठ संचालक शिवदास शिंदे, डॉ. विश्वनाथ आवाड, महाविद्यालय विकास समीतीचे अध्यक्ष तानाजी काशीद, संस्थेचे सचिव अश्रफ शेख, प्राचार्य डॉ. अरविंद कुंभार व संचालक मंडळ तसेच प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.