निमगाव वावडी महोत्सव समितीला सहकार्य करणार / ॲड एम एम मगर
भूमीपुत्र न्यूज
पारंपरिक वावडी उडविण्याची कला जतन करून निमगावची तरुण पिढी स्पर्धेच्या माध्यमातून वावडी महोत्सव गेल्या 4 वर्षांपासून भरवीत आहे हे कौतुकास्पद आहे याची दखल महाराष्ट्रा बरोबर महाराष्ट्राच्या बाहेर देखील घेतली जात आहे यामुळे या संयोजन समितीला मी आर्थिक मदत तर करणारच आहे याचबरोबर हा वावडी महोत्सव कायमस्वरूपी सुरू रहावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत ज्येष्ठ विधीज्ञ व आपला युवक शेतकरी फोरमचे संस्थापक अध्यक्ष ॲड एम एम मगर यांनी सांगितले .
ते निमगाव येथे वावडी महोत्सव संयोजन समितीचे आयोजक निनाद पाटील यांच्या निमगाव येथील फार्म हाऊसवर स्नेहभोजनासाठी आल्यानंतर बोलत होते यावेळी निमगाव वावडी महोत्सव संयोजन समितीच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ ॲड एम एम मगर यांचा व ज्येष्ठ लेखक, कवी हनुमंत पवार यांचा सन्मान करण्यात आला यावेळी उपसरपंच नंदकुमार पाटील, शिवामृत दूध उत्पादक संघाचे संचालक हरिश्चंद्र मगर, युवराज मगर ,बाळासाहेब मगर ,नंदकुमार मगर- पाटील, निनाद पाटील, दत्तात्रय मगर,जयसिंग मोरे ,विश्वनाथ मगर, गुलाब मगर, प्रमोद मगर ,सुरेश मगर, लालासाहेब मगर ,गंगाधर पवार, पत्रकार नितीन मगर, हर्षद मगर ,शशांक जाधव, आकाश मगर, अमोल मगर, समाधान मगर, आदी मान्यवर उपस्थित होते .
निमगाव वावडी महोत्सव संयोजन समितीच्या वतीने दरवर्षी नागपंचमी नंतर वावडी महोत्सवाचे आयोजन केले जाते या वावडी महोत्सवासाठी पंचक्रोशीतील तरुण पिढी आपल्या वावडी सह सहभागी होत असते व स्पर्धेच्या माध्यमातून विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह व रोख रकमेची बक्षीसे दिली जातात यावर्षी या वावडी उडविण्याच्या स्पर्धेबरोबरच महिलांच्याही वेगवेगळ्या खेळांच्या स्पर्धा भरवून गृहपयोगी वस्तू महिलांना भेट देण्यात येणार असल्याची माहिती आयोजक निनाद पाटील यांनी दिली लवकरच याबाबतीत प्रसिद्धी पत्र काढून माहिती देण्यात येणार आहे .