माळशिरस तालुकासामाजिक
नवनाथ लावंड यांचा सेवापूर्ती निमित्त सन्मान सोहळा संपन्न
भूमीपुत्र न्यूज
माळीनगर पाणी थोडा कामासाठी येथील दि सासवड माळी शुगर फॅक्टरीच्या इंजिनिअरिंग खात्यातील क्रेन ऑपरेटर पदावरील कर्मचारी नवनाथ महादेव लावंड तसेच सुभाष घोगरे ,बाबू शेळके हे गेल्या ३५ वर्ष प्रामाणिक सेवा बजावून दि ३१ मे रोजी वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले या बद्दल दि सासवड माळी शुगर फॅक्टरीच्या वतीने कारखाना कार्यस्थळावर त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळेस कारखान्यातील विविध खात्यांचे खातेप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी लोकनेते प्रतिष्ठानचे अकलूज चे अध्यक्ष जुल्कर शेख , शशिकांत करडे ,देवानंद साळवे ,गणेश करडे यांच्यासह मित्र परिवार यांनी सेवापूर्ती निमित्त शुभेच्छा दिल्या.