ऑलम्पिक मध्ये भारतासाठी मेडल आणणार / मीनाक्षी जाधव
भूमीपुत्र न्यूज
सर्वसामान्य कुटुंबातील जीवन व्यतीत करीत असताना सन 2010 साली माझा अपघात झाला आणि दोन्ही पाय गमवावे लागले तरीही न खचता न डगमगता जिद्द, चिकाटी, सततच्या प्रयत्नाने दोन्ही पाय नसताना प्रयत्न करणे सोडले नाही यातूनच सन 2017 साली महाराष्ट्राच्या टीम मध्ये व्हीलचेअर हँडबॉल साठी माझी निवड झाली याच वर्षी माझ्या वडिलांचे अपघाती निधन झालं मात्र पुन्हा एकदा नव्या उमेदीने आई व भावांच्या मदतीने उभे राहिले व भारतासाठी जागतिक स्पर्धेत व्हील चेअर हँडबॉल आणि व्हीलचेअर बास्केटबॉल मध्ये पदके मिळविली आता ऑलिम्पिक मध्ये भारतासाठी पदक मिळविण्याची इच्छा देशमुखवाडी ता माळशिरस येथील आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू मीनाक्षी हरिश्चंद्र जाधव यांनी व्यक्त केली.
तरंगफळ ता माळशिरस येथील स्व.राजमाता रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बहुउद्देशीय अपंग संस्था व माळशिरस तालुका प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेचे तालुकाध्यक्ष गोरख जानकर यांनी 59 व्या जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीनाथ विद्यालय व जुनिअर कॉलेज या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आबासाहेब शेंडगे, तरंगफळ चे माजी सरपंच भानुदास तरंगे,माजी उपसरपंच अविनाश तरंगे,ग्रामविकास अधिकारी संतोष पानसरे, मुख्याध्यापक संतोष शेंडगे, नारायण वाघमोडे,जगूबाई जानकर,कुलदीप जानकर, अण्णा नरोटे,रत्नमाला तरंगे आदी मान्यवर उपस्थित होते .
स्व.राजमाता रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बहुउद्देशीय अपंग संस्था व माळशिरस तालुका प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने यावेळी तरंगफळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील व श्रीनाथ विद्यालय व ज्युनिअर कॉलेज तरंगफळ मधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, वृक्षारोपण व खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी प्रशालेच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत गाऊन उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले तर कार्यक्रमाची सुरुवात स म शंकरराव मोहिते पाटील व स्व राजमाता रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन व मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला .तरंगफळ गावास महाराष्ट्र शासनाचा क्रमांक 2 चा वनश्री पुरस्कार प्राप्त झाल्याने तत्कालीन सरपंच रत्नमाला तरंगे यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश गोरवे तर आभार गोरख जानकर यांनी मानले.