औरंगाबाद प्रमाणे कोल्हापूर येथे सर्किट बेंच स्थापन होणे आवश्यक/ न्यायमूर्ती घुगे
भूमीपुत्र न्यूज/ (केदार लोहकरे यांजकडून)
औरंगाबाद प्रमाणे कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच स्थापन होणे आवश्यक आहे. असे मत मुंबई येथील उच्च न्यायालयाचे मा.न्यायमूर्ती रविंद्र व्ही घुगे यांनी कोल्हापूर येथे व्यक्त केले
मा.न्यायमूर्ती रविंद्र व्ही.घुगे हे शहाजी लॉ कॉलेजच्या माजी विद्यार्थी मेळावा करीता कोल्हापूर येथे आले असता खंडपीठ कृती समितीने सर्किट हाऊस येथे भेट घेतली यावेळी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड गिरीश खडके व सचिव अँड विजयकुमार ताटे-देशमुख यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीमती कविता बी.अग्रवाल उपस्थित होत्या.
यावेळी अध्यक्ष अँड गिरीश खडके म्हणाले की,कोल्हापूर सर्किट बेंच मागणी जुनी आहे, आता निर्णयायक टप्प्यावर आली आहे.आपले सहकार्य या मागणीस रहावे अशी सदिच्छा व्यक्त केली. न्यायमूर्ती रविंद्र घुगे म्हणाले की,कोल्हापूर हे शिक्षणाचे माहेर घर आहे,येथे वकील वर्गात टेलेन्ट आहे, आपली मागणी प्रदिर्घ काळापासून आहे त्यामुळे औरंगाबाद प्रमाणे कोल्हापूरमध्ये सर्किट स्थापन होणे आवश्यक आहे. माझे लॉचे शिक्षण व आयुष्याची जडणघडण कोल्हापूर मध्ये झाले असल्यामुळे येथील खंडपीठ मागणी लढा मला माहित आहे.
कोल्हापूर येथे सर्किट बेंच स्थापन झालेस इतर खंडपीठा प्रमाणे कोल्हापुरात देखील उत्तम दर्जाचे न्यायालयीन कामकाज होईल अशी आशा व्यक्त केली.
यावेळी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे सचिव विजयकुमार ताटे-देशमुख, लोकल ऑडिटर अँड.संकेत सावर्डेकर,अँड.सुशांत चेंडके, जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती एम.एस.काकडे,जिल्हा विधी सचिव पी.एम.पाटील,मुख्य न्यायदंडाधिकारी एस.ए.बाफना, न्यायाधीश पी.आर.राणे,व न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.