जिजामाता कन्या प्रशालेत विविध उपक्रमांनी ‘मराठी राजभाषा दिन’ साजरा

भूमीपुत्र न्यूज
कवि कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजच्या जिजामाता कन्या प्रशालेत मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात आला.विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुनिता वाघ यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.

यावेळीपोवाडा,भारुड,गवळण,लावणी,,वासुदेव,पिंगळा,ओव्या अशा विविध कार्यक्रमांचे बहारदार सादरीकरण झाले. ग्रंथापूजा करून ग्रंथदिंडी काढण्यात आली यावेळी प्रशालेतील सर्व मुली ग्रंथदिंडीत सहभागी झाल्या व मराठीचा जागर केला.

या निमित्ताने विद्यालयात ग्रंथप्रदर्शन भरविण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ साहित्यीक प्रशांत सुरुडकर यांनी बोलताना सांगितले की, महाराष्ट्र ही पराक्रमी योध्याची, संतांची व थोर साहित्यिकांची भूमी आहे.मराठी भाषेमुळे महाराष्ट्राला वैभव प्राप्त झाले आहे. मुख्याध्यापिका श्रीमती वाघ यांनी साहित्यिकांनी रचलेल्या विपुल साहित्य रचनेमुळे मराठी भाषा ही महाराष्ट्राची आण, बाण,शान बनली आहे असे गौरवोद्गार काढले.यावेळी विद्यालयातील मराठी विषय शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी विचारपीठावर पर्यवेक्षक यशवंत माने-देशमुख, मराठी विभाग प्रमुख गोरख पिसे,लोकनेता न्यूज चॅनलने प्रमुख रमेश साळवे,कलाप्पा सुर्यवंशी, प्रवीण गोडसे उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनुराधा कांबळे,राजश्री कणबुर, सुहास पवार,शोभा खराडे,सोनाली चौधरी,माधुरी भांगे व रोहित माने यांनी परिश्रम घेतले.