जयसिंह मोहिते-पाटील यांनी केले कौतुक
भूमीपुत्र न्यूज/ केदार लोहकरे
अकलूज येथे संत निरंकारी चँरीटेबल फाऊंडेशनच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात 152 अनुययानी रक्तदान करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला या रक्तदान शिबिराचे उदघाटन स म शंकराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी सोलापुर झोनचे प्रमुख इंद्रपालसिंह नागपाल,माजी सरपंच किशोरसिंह माने-पाटील,ज्ञानप्रचारक चाँदभाई तांबोळी,अकलुज नगरपरीषदेचे मुख्यधिकारी दयानंद गोरे,साळवे गुरुजी,पोपट टकले,लालासाहेब आडगळे,दिलीप कांबळे,शिवाजी जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना जयसिंह मोहिते-पाटील म्हणाले कुठलीही संघटना वाढवायची व टिकवायची असेल तर मनापासुन सहभागी होवुन प्रामाणिकपणे काम करणाऱ्या सेवकांची गरज महत्वाची असते.निरंकारी मंडळात सर्व जाती-धर्माचे लोक एकत्रीत येवुन मनापासून सेवाकार्यात सहभागी होत असल्याचे पहावयास मिळाले.निरंकारी मंडळ सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत राबवत असलेला रक्तदानाचा उपक्रम प्रशंसनीय असल्याचे सांगितले संत निरंकारी मंडळ सोलापुर झोनचे प्रमुख इंद्रपाल नागपाल यांनी जगभरात सुरु असलेले मंडळाच्या कार्याचा अढावा घेतला व आगामी फेब्रुवारी महिन्यात स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली.
रक्त संकलन करण्यासाठी इंडियन रेडक्रॉस सोसायटीची सर्जुबाई बजाज व अकलुज येथिल शंकरराव मोहिते-पाटील ब्लड बँकेने योगदान दिले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजिंक्य माने तर सुत्रसंचलन नागेश लोंढे यांनी केले.