डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अकलूज येथे सुप्रसिद्ध कव्वाल सुलतान नाझा यांचा कव्वाली कार्यक्रम संपन्न
भूमीपुत्र न्यूज
सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर जिल्हा अल्पसंख्यांक काँग्रेस कमिटी आणि मुस्लिम जमात माळशिरस तालुका यांच्यावतीने सुप्रसिद्ध कव्वाल सुलतान नाझा यांचा शनिवार दि 4 मार्च रोजी सायंकाळी 7 वा विजय चौक, अकलूज येथे कव्वाली कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी चढता सूरज धीरे धीरे ….,भर दो झोली मेरी मोहम्मद…यांसारख्या एकास एक कव्वाली सादर करीत सुलतान नाझा व त्यांच्या सहकाऱ्यांनी अकलूजकरांची मने जिंकली.
कार्यक्रमासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ धवलसिंह मोहिते पाटील, चिरब्स स्कूलच्या अध्यक्ष उर्वशीराजे मोहिते पाटील ,अण्णासाहेब इनामदार, सतीश पालकर, सुधीर रास्ते, नवनाथ साठे, ज्योती कुंभार, शाहीर राजेंद्र कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी जुल्कर शेख , फिरोज देशमुख, जावेद बागवान , मौलाना तय्यबअली, अफसर बागवान , आयुब कुरेशी , इब्राहिम मुलाणी , हुसेन शेख , इस्लाम पटेल, जुनैद बागवान , जाकीर शेख , मोहसीन बागवान, जावेद बागवान , इम्रान मोहोळकर, मोहम्मद आरिफ शेख , ताहेर मोहोळकर यांच्यासह मुस्लिम समाजातील कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.