दोन बायका ..फजिती ऐका….
अकलूजच्या अतुल अवताडे ने रिंकी व पिंकी बरोबर केलेला विवाह नियमबाह्य अकलूज पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल
भूमीपुत्र न्यूज
अकलूज वेळापूर रोडवर माळेवाडी या ठिकाणी असणाऱ्या गलांडे हॉटेल या हॉटेलमध्ये 2 डिसेंबर रोजी मुंबई येथील टॅक्सी ड्रायव्हर असणाऱ्या अतुल अवताडे यांनी मुंबईतीलच आयटी इंजिनियर असणाऱ्या रिंकी व पिंकी या दोन्ही जुळ्या बहिणीबरोबर विवाह केला या विवाह सोहळ्याचे व्हिडिओ व फोटो मीडिया व समाज माध्यमांवर प्रसारित झाल्या परंतु हा संसार रुळावर येण्यापूर्वीच अतुल अवताडे याच्यावर अकलूज पोलिसांनी कलम 494 नुसार गुन्हा दाखल केला यामुळे अतुल अवताडे वर दोन बायका आणि फजिती ऐका म्हणण्याची पाळी आली आहे
हिंदू मॅरेज ॲक्ट नुसार पहिला पती अथवा पत्नी असताना दुसरा पती अथवा पत्नी करणे हा गुन्हा आहे घटस्फोटानंतरच व पहिल्या पतीच्या अथवा पत्नीच्या मृत्यूनंतरच दुसरा विवाह करणे ग्राह्य धरले जाते परंतु मुंबईच्या रिंकी व पिंकीने अतुल अवताडे याच्याबरोबर (दोघींची परवानगी असताना सुद्धा )असा नियमबाह्य विवाह गलांडे हॉटेल या ठिकाणी केला यामुळे अकलूज पोलिसात माळेवाडी येथील राहुल फुले यांनी गुन्हा दाखल केला आहे या गुन्ह्याला सात वर्षे कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात यामुळे 2 डिसेंबर रोजी झालेल्या या आगळ्यावेगळ्या विवाहाला आता दोन बायका आणि फजिती ऐका अशी म्हणण्याची वेळ आली आहे मात्र अकलूज वेळापूर रोडवर असणाऱ्या गलांडे हॉटेल या हॉटेल मालकाने या विवाह सोहळ्यास परवानगी कशी दिली? हे ही पाहणे महत्त्वाचे आहे या अगोदरही असे विवाह या ठिकाणी झाले आहेत? की नाही ? याचबरोबर अल्पवयीन मुला मुलींचे विवाह तर या ठिकाणी होत नाहीत ना ? अशाही शंका उपस्थित केल्या जात आहेत
2 डिसेंबर रोजी रिंकी व पिंकी या जुळ्या दोन्ही बहिणीनी अतुल अवताडे बरोबर केलेला विवाह त्यांच्या वयाचे पुरावे घेऊन हा विवाह झालेला आहे त्यांना विचारणा केली असता या दोन्ही मुलींनी आम्ही अतुल अवताडे बरोबर विवाह करण्यास तयार असल्याचे सांगितले यानंतरच हा विवाह सोहळा झाला यापूर्वी या हॉटेलमध्ये अल्पवयीन मुला मुलींचे विवाह झालेले नाहीत व यापुढेही होणार नाहीत वयाचे दाखले घेऊनच सर्व विवाह होतात .
नाना गलांडे ,मालक हॉटेल गलांडे
Heya! I’m at work surfing around your blog
from my new iphone 3gs! Just wanted to say I love reading your blog and look forward to all your posts!
Carry on the fantastic work!