माळशिरस तालुकासामाजिकसोलापूर जिल्हा

अंधश्रद्धेला फाटा देत वाघोलीत शिवधर्म पद्धतीने केला तिसरा, सर्व विधी सातव्या दिवशी करण्याचा घेतला निर्णय

भूमीपुत्र न्यूज

16 जानेवारी 2023 रोजी वाघोली येथील प्रतिष्ठित बागायतदार दत्तात्रेय नारायण मिसाळ यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले होते. बुधवार 18 रोजी कै दत्तात्रय नारायण मिसाळ यांच्या अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम मौजे वाघोली ता माळशिरस येथे झाला. त्यांचे पुत्र माळशिरस तालुका संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष दिगंबर मिसाळ त्यांचे कुटुंबातील सर्व सदस्यांनी अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम अंधश्रद्धेला फाटा देऊन कै दत्तात्रय मिसाळ यांच्या अस्थी नदीच्या पाण्यात विसर्जित न करता वाघोली येथील स्मशानभूमीत सामाजिक कार्याचा भाग म्हणून विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करून आस्थी त्या रोपांच्या खड्ड्यात विसर्जित करण्यात आल्या. आस्थी विसर्जन व वृक्ष वृक्षारोपण करण्यापूर्वी राष्ट्रमाता जिजाऊ व कै दत्तात्रय मिसाळ यांच्या प्रतिमाचे पूजन करण्यात येऊन जिजाऊ वंदना म्हणण्यात आली यानंतर कुटुंबातील सर्व सदस्य नातेवाईक व गावातील जेष्ठ नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी सोलापूर जिल्हा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिनजी जगताप,पं स माजी सदस्य सूर्यकांत शेंडगे,पुणे विभागीय मराठा सेवा संघाचे अध्यक्ष उत्तमराव माने संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघाचे पदाधिकारी, तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष सुरेश पवार ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अंधश्रद्धेच्या आहारी न जाता कै दत्तात्रय मिसाळ यांचा अस्थि विसर्जनानंतरचे होणारे सर्वच विधी सातव्या दिवशी करण्याचा निर्णय दिगंबर मिसाळ व त्यांच्या कुटुंबाने घेऊन समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!