माळशिरस तालुकाशैक्षणिक

विजयसिंह मोहिते-पाटील नर्सिंग महाविद्यालयाच्या जी.एन.एम.विद्याशाखेच्या प्रवेश क्षमतेत वाढ

भूमीपुत्र न्यूज

अकलूज येथील शिवरत्न शिक्षण संस्था,संचलित विजयसिंह मोहिते-पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग अँन्ड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या जी.एन.एम या नर्सिंग अभ्यासक्रमाच्या विद्याशाखेच्या प्रवेश क्षमतेकरीता अधिक 30 जागाच्या वाढीस शासनाने मान्यता दिली असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा शितलदेवी मोहिते-पाटील यांनी दिली.

विजयसिंह मोहिते पाटील स्कूल ऑफ नर्सिंग महाविद्यालयात 30 विद्यार्थी प्रवेशक्षमेत नुसार जी.एन.एम अभ्यासक्रम सुरू होता.परंतु नर्सिंग क्षेत्रात जी.एन.एम या अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांचा प्रवेश घेण्याचा वाढता काल लक्षात घेता महाविद्यालयाने अधिकच्या प्रवेश क्षमता वाढीसाठी शासनाकडे प्रस्ताव दाखल केला होता.त्या अनुषंगाने वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांचेमार्फत सक्षमता तपासणी करण्यात आली व संस्थेस सन 2022-23 साठी 30(तीस विद्यार्थी प्रवेश क्षमता वाढीसह एकूण 60 (30+30) विद्यार्थी प्रवेश क्षमतेसह जी.एन.एम. अभ्यासक्रम सुरू करण्यास शासनाकडून मान्यता प्राप्त झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!