अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक…

सत्ताधारी विजयसिंह मोहिते पाटील पॅनल विरुद्ध
माळशिरस तालुका शेतकरी विकास आघाडी पॅनल यांच्यात होणार सरळ लढत;18 जागांसाठी 36 अर्ज…
भूमीपुत्र न्यूज
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीत आज अर्ज माघारी घेण्याच्या 20 एप्रिल 2023 या अंतिम दिनी 63 पैकी 27 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले. यामुळे 18 जागांसाठी सत्ताधारी विरूध्द विरोधक यांचे 36 नामनिर्देशन पत्र राहिल्याने या निवडणुकीत सत्ताधारी विजयसिंह मोहिते पाटील पॅनल विरूध्द माळशिरस तालुका शेतकरी विकास आघाडी पॅनल अशी सरळ दुरंगी लढत होणार आहे.

सहकारी संस्था मतदार संघातील सर्वसाधारण गटामध्ये सत्ताधारी विजयसिंह मोहिते पाटील पॅनल मधून मदनसिंह मोहिते-पाटील, मारूतराव रूपनवर, शिवाजी चव्हाण, नितीन सावंत, बाबूराव कदम, बाळासोा माने देशमुख, लक्ष्मण पवार हे सर्वसाधारण जागेमधून तर महिला राखीव मतदार संघातून मेघा साळुंखे ,अमृता सुरवसे इतर मागासवर्गीय गटामध्ये भानुदास राऊत तर विमुक्त जाती भटक्या जमाती गटामध्ये संदीप पाटील , ग्रामपंचायत मतदार संघातील सर्वसाधारण गटामध्ये बापूराव पांढरे, शहाजीराव देशमुख,अनुसुचित जाती जमाती गटामध्ये दत्तूराम लोखंडे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामध्ये पोपट भोसले, व्यापारी मतदार संघामध्ये आनंद पडे, महावीर गांधी हमाल तोलार मतदार संघामध्ये उध्दव डांगरे, हे 18 उमेदवार सत्ताधारी विजयसिंह मोहिते पाटील पॅनलचे असणार आहेत .
तर याच सहकारी संस्था मतदार संघातून विरोधी माळशिरस तालुका शेतकरी विकास आघाडी पॅनल मधून नागेश काकडे उत्तम जानकर, बाळासाहेब सावंत, गणेश इंगळे, पांडुरंग पिसे, पांडुरंग वाघमोडे, दादासाहेब लाटे, तर महिला राखिव मतदार संघामध्ये पद्मजादेवी मोहिते-पाटील, सोनाली पाटील, इतर मागासवर्ग गटामध्ये भिमराव पुले, विमुक्त जाती भटक्या जमाती गटामध्ये अजित बोरकर,ग्रामपंचायत मतदार संघातील सर्वसाधारण गटामध्ये पदमजादेवी मोहिते-पाटील, केशवराव पाटील, अनुसुचित जाती जमाती गटामध्ये उत्तम जानकर, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामध्ये यशवंतराव घाडगे, व्यापारी मतदार संघामध्ये मोहसीन बागवान, दिपक गरड, हमाल तोलार मतदार संघामध्ये संजय कोळेकर हे माळशिरस तालुका शेतकरी विकास आघाडी पॅनलचे उमेदवार असणार आहेत.
सत्ताधाऱ्यांच्या विरोधात माळशिरस तालुक्यातील विरोधकांची अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून एकजूट झालेली पहावयास मिळत असून उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांनी माळशिरस तालुका शेतकरी विकास आघाडी पॅनल ही निवडणूक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढत असल्याचे सांगितले यामुळे सत्ताधारी विजयसिंह मोहिते पाटील पॅनल व विरोधी माळशिरस तालुका शेतकरी विकास आघाडी पॅनल यांच्यात आगामी काळात रंगतदार लढत पाहावयास मिळणार आहे .




