माळशिरस तालुका खते ,औषधे व बी बियाणे वितरक संघटनेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन, 30 तारखेपासून बेमुदत बंदचा इशारा
भूमीपुत्र न्यूज
माळशिरस तालुका खते ,बी बियाणे व औषध वितरक संघटनेने आ रणजितसिंह मोहीते पाटील, आ राम सातपुते, तालुका कृषी अधिकारी, प्रांताधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार माळशिरस, पोलीस निरीक्षक माळशिरस यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले आहे.
यामध्ये रासायनिक खतांसोबत उत्पादकांकडुन होत असलेल्या अवाजवी लिंकींगबाबत ,रासायनिक खत उत्पादकाकडुन दुकानदारांना होणारे एक्स खत पुरवठयामुळे होणारा अन्याय व त्या अनुषंगाने शासनाच्या नियमांचे होणारे उल्लंघन, रासायनिक खत ,बि बियाणे,व किटकनाशके याचे नमूने अप्रमाणीत आल्यावर होणाऱ्या कारवाईबाबत,रेल्वे स्टेशन व गोदामामधुन व्यापाऱ्यांना पोहोच मिळणेबाबत, कंपनी कडुन सिल पॅक आलेला माल त्याचे समपलींग गुणनियंत्रण अधिकाऱ्यांकडुन नमुने काढले जात असता त्याचा नमुना फेल गेला की काही संबंध नसताना दुकानदारावर कारवाई केली जाते.तरी अशावेळी उत्पादकावर कारवाई करावी.
खरीप 2022 च्या सुरुवातीलाच महाराष्ट्राचे कृषीमंत्री व केंद्राने लिंकींग न करण्याचे आदेश दिले आहेत मात्र खत उत्पादकानी स्वतःच्या फायद्यासाठी लिंकींग चालुच ठेवले आहे. केंद्र सरकार रासानिक खतावर अनुदान देते.रेल्वे स्टेशनवर खताचा रॅक असताना ते गोदामात नेऊन नंतर व्यापाऱ्यांना बोलावले जाते यामुळे खरे तर वाहतुकीचा खर्च वाढतो याचा शेतकऱ्यांना मोठा भुरदंड बसतो .
या सर्व बाबीबाबत खत उत्पादकांकडून लेखी आश्वासन शासनाला व विक्रेत्यांना दिले नाही तर 30 जानेवारी पासून सर्व विक्रेते बेमुदत संपावर जाण्याचा इशारा माळशिरस तालुका खते, बी बियाणे व औषधे वितरकांकडून देण्यात आले आहे. संपामुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीस आम्ही जबाबदार नसल्याचे अशोसिएशनच्यावतीने निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर अध्यक्ष भिमराव शेंडगे,उपाध्यक्ष सुनील गांधी ,सचिव उमेश देशमुख, सहसचिव महावीर शेंडगे ,खजिनदार संतोष साळी यांच्या सह्या आहेत.