एकनाथ पराडे यांचा बाभूळगाव येथे सन्मान सोहळा संपन्न

भूमीपुत्र न्यूज
बाभुळगाव ता माळशिरस येथील एकनाथ बलभीम पराडे यांना नुकताच महाराष्ट्र शासनाचा महात्मा गांधी व्यसनमुक्त सेवा पुरस्कार मिळाल्याबद्दल बाबुळगाव ग्रामस्थ , रावसाहेब पराडे पाटील मित्र मंडळ व व्यसनमुक्त युवक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि 6 एप्रिल रोजी बाभुळगांव येथील श्री श्री. श्री. रविशंकर सांस्कृतिक भवन येथे सन्मान करण्यात आला.

यावेळी बापूसाहेब महाराज मोरे देहूकर,समाजभूषण डॉ.लक्ष्मण आसबे,धैर्यशील देशमुख,दिपक जाधव, प्रा. धनंजय देशमुख,तांबिले, सुनील पाटील,भजनदास मिसाळ, जयंत पाटोळे ,सरपंच एकनाथ शिंदे, संचालक दत्तात्रय चव्हाण,रावसाहेब पराडे, सेवानिवृत्त आदर्श शिक्षक सुग्रीव मिटकल,डॉ. भास्कर पराडे , दत्तात्रय पराडे,सतीश दळवी,निकिता पराडे, तेजल खटके ,व्यसनमुक्त संघटनेचे तालुका,जिल्हा व राज्य कार्यकारणी सदस्य, आर्ट ऑफ लिव्हिंग चे सदस्य, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमानंतर अन्नदान करण्यात आले यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँक बोरगाव शाखेचे शाखाधिकारी शिवाजी पराडे यांनी केले ,सूत्रसंचालन सचिन पराडे तर आभार दत्तात्रय पराडे यांनी मानले.




