महाराष्ट्रमाळशिरस तालुकाविशेषसामाजिकसोलापूर जिल्हा

ज्येष्ठ साहित्यिक ,लेखक ,कवी हनुमंत पवार यांचा माळशिरस तालुक्यातील अधिकारी व माळशिरस तालुका पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने सन्मान

भूमीपुत्र न्यूज

निमगाव येथील ज्येष्ठ, साहित्यिक, लेखक, कवी हनुमंत पवार सर यांचा माळशिरस तालुक्यातील अधिकारी व माळशिरस तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सन्मान करण्यात आला हनुमंत पवार यांनी नुकतेच श्री छत्रपतींना समजून घेऊया हा ऐतिहासिक चरित्र ग्रंथ लिहिला असून या ऐतिहासिक चरित्र ग्रंथाचे प्रकाशन सातारा येथे 1जानेवारी 2026 रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

हनुमंत पवार सर यांनी सातत्याने लिखाण करून समाजप्रबोधनाचं काम केलं आहे हे काम कौतुकास्पद असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सुनीता पाटील यांनी सांगितले.

माळशिरस तालुका पत्रकार संघाच्या सन 2026 च्या दिनदर्शिका प्रकाशन समारंभात हनुमंत पवार सर यांचा सन्मान करण्यात आला. या अगोदरही हनुमंत पवार सर यांनी काजव्यांचे जग व वेड्या मना हे दोन कवितासंग्रह तर सोबत व ऑडिट हे दोन कथासंग्रह प्रकाशित केले असून या अगोदर ऐतिहासिक चरित्र ग्रंथ म्हणून स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्यावरही लिखाण केले असून या पुस्तकाला अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कारही मिळाला आहे नुकतेच त्यांनी श्री छत्रपतींना समजून घेऊया हे पुस्तक लिहिले असून प्रकाशन अगोदरच या पुस्तकाला प्रचंड मागणी होत आहे.पवार सर यांनी समाज प्रबोधनात केलेल्या कार्याचा आढावा घेऊन माळशिरस तालुक्यातील अधिकारी व माळशिरस तालुका पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता मा सुनीता पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी विचारपीठावर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अकलूजचे अधिकारी अश्विनकुमार पोंदकुले ,तालुका कृषी अधिकारी आबासाहेब रुपनवर, सामाजिक वनीकरण विभागाच्या वनपरिक्षेत्राधिकारी, श्रीमती ए आर ससाने, सा बां विभाग अधिकारी गोविंद कर्णावर पाटील ,निवासी नायब तहसीलदार अमोल कदम, माळशिरस पोलीस निरीक्षक विकास दिंडुरे, अकलूज पोलीस निरीक्षक नीरज उबाळे, वेळापूर पोलीस स्टेशनचे एपीआय भाऊसाहेब गोसावी, नातेपुते पोलीस स्टेशनचे एपीआय महारुद्र परजने, माळशिरस च्या सहाय्यक दुय्यम निबंधक रूपाली कदम , सहाय्यक महसूल अधिकारी संदीप कोळेकर, पुरवठा निरीक्षण अधिकारी रविकिरण शेटे, पुरवठा निरीक्षक श्रीमती सुप्रिया वजाळे ,वनविभागाचे धर्मेंद्र सावंत ,विजय काळे , पंचायत समिती बांधकाम विभागाचे इस्माईल मुलानी,माळशिरस तालुका पत्रकार संघाचे कायदेशीर सल्लागार ॲड जी पी कदम ,बाळासाहेब वावरे, दत्ताजीराव मगर,बाळासाहेब सरगर, श्रीनिवास कदम पाटील, जयकुमार केचे पाटील,सचिन गायकवाड, सतीश दडस ,अजिनाथ देशमुख ,बापूसाहेब वाघमोडे ,प्रकाश काशीद आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी माळशिरस तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज राऊत ,उपाध्यक्ष एल डी वाघमोडे ,दिनेश माने देशमुख ,सचिव उदय कदम ,सहसचिव अभिजीत जाधव, खजिनदार सतिश पारसे, निनाद पाटील, विनोद बाबर ,संजय देशमुख, संजय पवार, नितीन मगर,ओंकार आडत, शाहरुख मुलाणी आदी मान्यवर, पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!