अकलूजच्या उपविभागीय पोलिस अधिकारी पदी आयपीएस श्रीमती कीरितीक सी एम,विद्यमान डी.वाय.एस.पी सई भोरे पाटील यांची बदली
भूमीपुत्र न्यूज
अकलूजच्या उपविभागीय पोलीस अधिकारी पदी (डीवायएसपी) आयपीएस श्रीमती कीरितिका सी एम यांची नेमणूक झाली असून विद्यमान डीवायएसपी सई भोरे पाटील यांची पोलीस महासंचालक ,महाराष्ट्र राज्य यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण न्यायालय यांचे आदेश निवडणुकीची आदर्श आचारसंहिता कायदा व सुव्यवस्था इत्यादी लक्षात घेऊन अकलूजच्या उपविभागीय पोलीस अधिकारी सई प्रताप भोरे पाटील यांची अकलूज येथून पोलीस उपअधीक्षक, पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी बदलीने पदस्थापना करण्यात आली आहे .
अकलूज या ठिकाणाहून अल्पावधीतच सई भोरे पाटील यांची दौंड या ठिकाणी बदली झाली असून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बदली झाली असल्याचे वृत्त असून अकलूज या ठिकाणी सई भोरे पाटील यांनी आपल्या कामाने सर्वसामान्य जनतेची मने जिंकली होती एक महिला अधिकारी म्हणून त्यांच्याकडे सन्मानाने पाहिले जात होते आपल्या कार्यकर्तुत्वाचा ठसा त्यांनी अल्पावधीतच अकलूज आणि माळशिरस तालुक्यात उमटविला होता त्यांच्या बदलीने रिक्त झालेल्या त्यांच्या जागेवर महिला म्हणून श्रीमती कीरितीका सीएम या आयपीएस महिला अधिकाऱ्यांची नेमणूक झाली आहे.