डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कव्वाली कार्यक्रम
भूमीपुत्र न्यूज
सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दि.4 मार्च रोजी सायं.7 वा विजय चौक, अकलूज येथे सुप्रसिद्ध कव्वाल सुलतान नाझा यांचा जंगी कव्वालीचा कार्यक्रम आयोजित केली असल्याची माहिती. सोलापूर जिल्हा अल्पसंख्यांक काँग्रेस कमिटी, मुस्लिम जमात, माळशिरस तालुका यांच्यावतीने देण्यात आली आहे.
यावेळी फिरोज देशमुख,जुल्कर शेख, मौलाना तय्यबअली, अफसर मोहोळकर,जावेद बागवान, मोहसीन बागवान,जावेद बागवान, आयुब कुरेशी,हुसेन शेख, इब्राहिम मुलानी, जावेद तांबोळी , इम्रान मोहोळकर आदी उपस्थित होते . डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या 4 मार्च रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण जिल्हाभर विविध सामाजिक उपक्रम राबविले जाणार असून यामध्ये अकलूज येथे मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने कव्वालीच्या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे तरी या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे .