माळशिरस तालुकासामाजिक

जिजाऊ ब्रिगेडच्या माळशिरस तालुकाध्यक्षा मनोरमा लावंड “दीपस्तंभ नारी” पुरस्काराने सन्मानित

भूमीपुत्र न्यूज

जिजाऊ ब्रिगेडच्या माळशिरस तालुका अध्यक्षा मनोरमा लावंड यांच्या कार्य कर्तृत्वाची दखल घेत सातारा येथे नुकताच त्यांचा दीपस्तंभ नारी सन्मान पुरस्काराने सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव,सरपंच नाथा कदम,ध्यास फाउंडेशनच्या अध्यक्षा वैजयंती ओतारी,सचिव सचिन कांबळे, ॲड.सुरेश रुपनवर आदी मान्यवर उपस्थित होते.

सातारा येथील ध्यास फाउंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा महिला दिनाचे औचित्य साधून दरवर्षी सन्मान सोहळा आयोजित करण्यात येतो. यावर्षीही या सन्मान सोहळ्याचे थाटामाटात आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी माळशिरस तालुक्याच्या जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा मनोरमा लावंड यांच्या कार्यकर्तृत्वाची दखल घेत त्यांना दीपस्तंभ नारी सन्मान पुरस्कार देण्यात आला.

यावेळी सरस्वती वशिवळे,डॉ.अरुणा बर्गे,वैशाली माळी,रेखा नंदीवाले,ॲड.साधना माने,मनोरमा लावंड,स्वरूपा पोरे,आशा बोडस,दिपाली महामुनी आदि महिलांचा सन्मान करण्यात आला.हॉटेल गुलबहार पवई नाका सातारा येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. दीपस्तंभ नारी हा पुरस्कार मिळाल्याने मनोरमा लावंड यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!