श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या 675 व्या अमृत महोत्सवी संजीवन समाधी सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बुधवारी पंढरपूर येथे आगमन

भूमीपुत्र न्यूज
श्री संत शिरोमणी नामदेव महाराज परिवार व संत जनाबाई महाराज यांचा बुधवार दि 23 जुलै रोजी 675 वा (षष्ठ शतकोत्तर) अमृत महोत्सवी संजीवन समाधी सोहळा पंढरपूर येथे मनमाडकर हॉल, एलआयसी ऑफिस समोर श्री संत नामदेव क्षत्रिय एकसंग, श्री केशवराज संस्था नामदेव मंदिर पंढरपूर, श्री संत नामदेव शिंपी समाज पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर येथे आयोजित केला असून या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बुधवार दिनांक 23 जुलै रोजी पंढरपूर येथे या कार्यक्रमासाठी येत असल्याची माहिती कार्यक्रमाचे संयोजक व श्री संत नामदेव क्षेत्रीय एकसंगचे राष्ट्रीय अध्यक्ष महेश ढवळे यांनी दिली.

दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या पंढरी नगरीत बुधवार दिनांक 23 व गुरुवार दिनांक 24 जुलै रोजी हा संजीवनी समाधी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत असून या कार्यक्रमासाठी राज्याचे ग्रामविकास,पंचायत राज व जिल्ह्याचे पालकमंत्री ना जयकुमार गोरे ,आ समाधान आवताडे ,मा आ प्रशांत परिचारक ,भाजपाचे अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांच्यासह आदी मान्यवर ,भक्तगण उपस्थित राहून धार्मिक चैतन्याचा व सात्विक ऊर्जेचा अनुभव घेणार आहेत याचबरोबर राज्यातील श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांचे भक्तगण ही मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत हा आपलाच कार्यक्रम असून सर्वांनी आपल्या परिवारासह ,महिलांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून या चैतन्य, आनंदमय ऊर्जा स्तोत्राचा आनंद घ्यावा व ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार व्हावे असे या कार्यक्रमाच्या सहसंयोजिका व पिंक रेवोल्युशन संस्थेच्या अध्यक्षा डॉ श्रद्धा जवंजाळ यांनीही आवाहन केले आहे.

सध्याच्या धावपळीच्या व धकाधकीच्या जीवनात मानवतेची, समतेची एकतेची गुढी श्री संत नामदेवरायांच्या आशीर्वादाने आपण सर्वजण हातात हात घालून पुढे नेऊयात आणि श्रीक्षेत्र पंढरपूर नगरी श्री संत नामदेव ,जनाबाई या नामघोषाने दुमदुमीत करूयात असे अखिल भारतीय श्री संत नामदेव क्षत्रिय एकसंग, श्री केशवराज संस्था नामदेव मंदिर व श्री नामदेव शिंपी समाज पंढरपूर या संस्थेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्टचे सहअध्यक्ष हभप औसेकर महाराज यांनीही या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे अवाहन केले आहे.




