लढण्यास बळ देणारे नेतृत्व /श्रीमती पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते पाटील
भूमीपुत्र न्यूज
लोकशाहीत निवडणुका कोणत्याही असो त्या सर्व निवडणुकांकडे लहान मोठी निवडणूक म्हणून न पाहता लोकशाही बळकट राहण्यासाठी निवडणुका झाल्या आणि लढल्याही पाहिजेत.परंतु कायमच सत्तेत असलेल्या प्रस्थापितांच्या विरोधात लढवायचे म्हटलं की नेते व कार्यकर्तेही तयार होत नाहीत. सत्तेच्या बाजूने निवडणुका लढण्यासाठी नेत्यांची व कार्यकर्त्यांची रीघ असते परंतु प्रस्थापितांच्या विरोधात लढण्यासाठी सहजासहजी कोणीच तयार होत नाही मात्र आशा प्रस्थापित नेतृत्वाच्या विरोधात जय पराजयाची तमा न बाळगता निवडणूक लढण्यासाठी एका निर्भीड,निस्वार्थी,सक्षम व कणखर नेतृत्वाची गरज असते आणि ते नेतृत्व म्हणजे अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सहकारी संस्था मतदार संघातून व ग्रामपंचायत मतदार संघातून निर्भीडपणे लढलेल्या सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट सदस्या व लोकनेते स्व प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या अर्धांगिनी श्रीमती पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते पाटील.
लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे निवडणूक कोणतीही असो यामध्ये जय पराजयाची तमा न बाळगता ती निवडणूक लढली पाहिजे माणसाचा पहिला पराभव त्याच्या मनात होतो व नंतर रणांगणात होतो यामुळे लढत राहिले पाहिजे यामुळे तुमच्या कष्टाला व परिश्रमाला एक ना एक दिवस निश्चितच फळ मिळणार आहे यानुसार श्रीमती पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी कणखर व ताठ मानेने कोणतीही तमा न बाळगता अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लढवली भले यामध्ये पराभवाला सामोरे जावे लागले परंतु त्यामधून नवीन नेत्यांना व कार्यकर्त्यांनाही बळ मिळाले ही जमेची बाजू विसरता कामा नये .
स्थापनेपासूनच अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील परिवाराची सत्ता राहिली आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू मदनसिंह मोहिते पाटील हे या बाजार समितीचे विद्यमान अध्यक्ष आहेत या प्रस्थापितांविरोधात लढण्यासाठी माळशिरस तालुक्यातील सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सर्वच विरोधक एकत्र आले आणि लढलेही परंतु लढत असताना सेनापतीची भूमिका कोणी बजावयाची याबाबतीत अनेक तर्क वितर्क नंतर सर्वांच्या समोर एकच नाव आलं आणि ते म्हणजे… लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या कणखर व स्वाभिमानी अर्धांगिनी पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते पाटील त्या लढल्या… आणि सर्वांच्या मनात जिंकल्याही …यामुळे लढण्यास बळ देणार व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे आवर्जून पहावेच लागेल . अशा या नेतृत्वाला सलाम