अकलूजच्या शंकरराव मोहिते महाविद्यालयात शालेय बुद्धीबळ क्रिडा स्पर्धा संपन्न
भूमीपुत्र न्यूज
शंकरराव मोहिते महाविद्यालय व जिल्हा क्रीडा कार्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने खाशाबा जाधव इंडोर स्टेडियम येथे तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ क्रीडा स्पर्धा नुकत्याच पार पडल्या.
या स्पर्धांची सुरवात सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील व अक्कासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून या स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय बागडे व कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक राजकुमार इंगोले यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी व्यासपीठवर निमगाव विद्यामंदिर निमगाव या शाळेचे क्रीडा शिक्षक ठवरे व महाविद्यालयाचे प्रा.दादासाहेब कोकाटे व कार्यालयीन अधीक्षक युवराज मालुसरे व या स्पर्धेसाठी पंच म्हणून लाभलेले आठवले ,अली शेख ,बोराटे व स्पर्धा प्रमुख अभिजीत बावळे सर व कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक बाळासाहेब भोसले उपस्थित होते.
स्पर्धेत १४ वर्षे वयोगट १७ वर्षे वयोगट व १९ वर्षे वयोगटातील एकूण ११० खेळाडू सहभागी झाले आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय जाधव यांनी केले यावेळी माळशिरस तालुक्यातील विविध शाळांचे क्रीडाशिक्षक व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्पर्धेत मुले १४ वर्ष गट – श्रवण किशोर बोराटे (प्रथम), रेहान फिरोज आतार (व्दितीय),सार्थक सुवेद भांगे (तृतीय),सम्राट संदिप घाडगे (चतुर्थ), सोमेश्वर धनंजय माने (पंचम),मुले १७ वर्ष गट- यशराज अरविंद कोरटकर (प्रथम),पार्थ कालीदास सावंत (व्दितीय),मोहित दत्तात्रय जगताप (तृतीय),शुभम ज्योतीराम गाडे (चतुर्थ),अनमोल प्रकाश वाघमारे (पंचम),मुले १९ वर्ष गट- अभिषेक सुधीर पवार (प्रथम),गणेश प्रविण अकोलकर(व्दितीय),प्रतिक दत्तात्रय म्हस्के (तृतीय),प्रथमेश शिवाजी वाघमोडे (चतुर्थ), यशराज संतोष जगताप (पंचम)
मुली १४ वर्ष गट- रक्षिता रमेश जाधव (प्रथम),मनस्वी हरिषसिंह राजपुरोहित (व्दितीय ), समृध्दी अरूण बाबर (तृतीय),पायल शामराव बिचकुले (चतुर्थ), सृष्टी प्रज्योत हांगे (पंचम),मुली १७ वर्ष गट- सारिका अभिजीत बावळे (प्रथम),गौरी विष्णुदेव माने-देशमुख (व्दितीय),उन्नती सचिन बोराटे (तृतीय),रिया रविंद्र भंडारे (चतुर्थ),पायल किशोर काळे (पंचम),मुली १९ वर्ष गट- स्नेहल बाळासो शिरकांडे (प्रथम),शितल बाळासो गेजगे (व्दितीय),नेहा दिपक झेंडे (तृतीय),सानिका गोविंद बिचकुले (चतुर्थ)
असे क्रमांक विद्यार्थ्यांनी मिळवले