जय भवानी गड विकास प्रतिष्ठानचे सचिव हर्षवर्धन खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त लाखेवाडी येथे बुद्धिबळ स्पर्धा संपन्न
पुणे ,सातारा व सोलापूर जिल्ह्यातील 290 स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग अध्यक्ष श्रीमंत ढोले व उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण संपन्न
भूमीपुत्र न्यूज
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी येथील जय भवानी गड विकास प्रतिष्ठानचे सचिव हर्षवर्धन खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल ,विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज आणि विद्यानिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशालेमध्ये अंतर शालेय राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत पुणे सातारा व सोलापूर जिल्ह्यातील 290 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला या स्पर्धा विविध वयोगटात घेण्यात आल्या होत्या.
अत्यंत चुरशीने झालेल्या या स्पर्धेत 10 वर्षे वयोगटात वेदांत सचिन मुसळे ,सानवी दत्तात्रेय गोरे ,सिद्धांत सागर कोठारे ,शौर्य भोंडवे ,ओम नांदले, श्रेया माने, हर्ष जाधव, विहान कोंगारे, वेदांत पांडेकर ,परशुराम जामदार या विद्यार्थ्यांनी या गटात बाजी मारली.वय वर्ष 11 ते 15 या गटात जिया शेख ,ध्रुव पाटील ,आर्यन परदेशी, सोहम कुटे ,श्रेया पटला ,रक्षिता जाधव ,अथर्व राठोड, राज दुधाळ, रुद्र फुले ,तन्मय घाटे यांनी सुयश संपादिले तर 16 ते 21 वर्ष वयोगटात ओम लामकाने, हर्षल पाटील, प्रथमेश शिंदे, ओम शिंदे ,इनास शेख, सुमित गरगडे ,गणेश अकोलकर, सुरेश माने ,अजय तांबिले यांनी बाजी मारली.
सर्व विजेत्या स्पर्धकांचा प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला यावेळी जय भवानी गड विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीमंत ढोले, उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले, सचिव हर्षवर्धन खाडे, संस्थेचे प्रमुख सल्लागार प्रदीप गुरव ,गणेश पवार ,प्राचार्य राजेंद्र सरगर ,फार्मसी कॉलेजचे प्राचार्य सम्राट खेडकर आदी मान्यवर उपस्थित होते .