महाराष्ट्रसोलापूर जिल्हा
उजनी धरणावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी…उजनी धरण विशेष वृत्त …
भूमीपुत्र न्यूज
आज रविवार दि 1 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 1.00 वा उजनी धरणात 25 हजार 857 क्युसेक्स ने पाणी येत असून धरणाची टक्केवारी 37.24 अशी झालेली आहे.
उजनीत येणाऱ्या पाणी विसर्गात सतत वाढ होत आहे ,कारण बंडगार्डन विसर्ग 12 हजार600 क्युसेक्स असून इतर धरणातून खाली येणाऱ्या पाण्यामुळे एकूण 22 हजार 635 क्युसेक्स प्रवाहाने पाणी दौंड च्या दीशेने येत आहे.
आज सायंकाळपर्यंत उजनी 40% ओलांडेल अशी नियंत्रण विभागाकडून अधिकृत माहिती येत आहे.