पत्रकारितामाळशिरस तालुकासामाजिकसोलापूर जिल्हा

पत्रकार राजीव लोहकरे यांना “आराधना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार” प्रदान

भूमीपुत्र न्यूज

आराधना संस्था व मधुरिया टूर्स अ‍ॅन्ड ट्रॅव्हल्सच्या वतीने अकलूज चे सुपुत्र व दैनिक लोकमतचे माळशिरस तालुका प्रतिनिधी आदर्श पत्रकार राजीव लोहकरे(अकलूज) ,मनोहर,सुतार ,दृष्टी बाधित मार्गदर्शक मुंबई ,सतिश वाघमारे, दृष्टी बाधित आदर्श कलाकार तर ,प्रशांत कटारे (सोलापूर) यांचा आराधना राज्यस्तरीय पुरस्काराने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

पत्रकार राजीव लोहकरे

दृष्टी बाधितासाठी मनोरंजनातुन नेत्रदानाचा प्रसार कार्य करणा-या आराधना संस्था व मधुरिया टूर्स अ‍ॅन्ड ट्रॅव्हल्स च्या वतीने लुई ब्रेल जयंती व पत्रकार दिनाचे औचित्य साधुन निर्मलकुमार फडकुले सभागृहात आराधना राज्य स्तरीय पुरस्कार वितरण जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते मनोहर सुतार,सतिश वाघमारे,राजीव लोहकरे,प्रशांत कटारे यांचा सन्मानपत्र,सन्मान चिन्ह शाल,श्रीफळ व पुष्प गुच्छ देवुन सन्मान करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.माधुरी वाळवेकर,वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुर्वे,आराधना संस्थेचे अध्यक्षा मयुरा पोतदार,उपाध्यक्ष शरद पोतदार,सचिव नंदकुमार महामुनी,सहसचिव अमोल पोतदार,खजिनदार शशिकांत घोडके,सदस्य डाॅ.दिपक पोतदार,शैलेश पोतदार,दत्ता काळे याच्यासह निमंत्रित उपस्थित होते.

आराधना सामाजिक संस्थेने मनोरंजनातून नेत्रदान प्रचार प्रसार करण्याचा जो उपक्रम हाती घेतला आहे तो उपक्रम नसून त्यांनी उभी केलेली चळवळ आहे. खरे तर हे काम प्रशासनाचे आहे मात्र आराधनाच्या या कार्यास प्रशासन म्हणून आमचा कायम पाठिंबा राहील याचबरोबर आपल्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या दृष्टी बाधितांना आणि पत्रकारिता क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांना आदर्श पुरस्काराने गौरविणे हे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे.
मिलिंद शंभरकर , जिल्हाधिकारी सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!