प्रदेशाध्यक्ष आ जयंत पाटलांचा फोन… अकलूज मधील नेतेमंडळी खा. शरद पवार की, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे ?
भूमीपुत्र न्यूज
सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीत माळशिरस तालुक्यातील सत्ताधाऱ्यांसह विरोधक भाजपच्या बाजूने एकवटले असतानाही राष्ट्रवादीचे तत्कालीन उमेदवार आ संजय शिंदे यांना माळशिरस तालुक्यातून जवळपास 50 हजार मतदान देणारे अकलूज मधील राष्ट्रवादीचे नेते मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत ? अशी चर्चा माळशिरस तालुक्यात सुरू आहे.
मंगळवार दि 4 जुलै रोजी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा अकलूज मधील या नेते मंडळींचा फोनवरून संपर्क झाला आणि या नेते मंडळींनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे आपली भूमिका बोलून दाखविले मात्र ही भूमिका गुलदस्त्यातच असून अकलूज मधील नेते मंडळींनी बुधवार दि 5 जुलै रोजी मुंबईत दोन्ही पवारांच्या सभेसाठी जाण्याचे टाळले यामुळे अकलूज मधील नेतेमंडळी नेमकी कोणाकडे ? हा प्रश्न विचारला जात आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अकलूज मधील नेतेमंडळींनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला पसंती दिल्याची माहिती असून येत्या आठवड्याभरात अकलूजमधील नेतेमंडळी आपल्या कार्यकर्त्यांशी विचार विनिमय करून राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार ,की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापैकी कोणाकडे जायचे हा निर्णय जाहीर करणार आहेत.
माळशिरस तालुक्यात राष्ट्रवादीचे दोन गट पडल्याचे दिसून येत आहे राष्ट्रवादीचे गत विधानसभेचे उमेदवार उत्तमराव जानकर हे मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या झालेल्या सभेसाठी उपस्थित होते यावरूनच ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत जातील असा अंदाज व्यक्त केला जात आहे तर दुसरा गट राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे जाईल असे बोलले जात आहे.