शंकरराव मोहिते महाविद्यालयाच्या खेळाडूंची शालेय राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड
भूमीपुत्र न्यूज
पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या मैदानावर पुणे विभागीय शालेय मैदानी स्पर्धा संपन्न झाली. यामध्ये अकलूजच्या शंकरराव मोहिते महाविद्यालयातील खेळाडूंनी 19 वर्षे वयोगटात मुले 4×100 व 4×400मीटर रिले स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून यश संपादन केले या खेळाडूंची बालेवाडी येथे होणा-या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या यशस्वी खेळाडूमध्ये सुमित दत्तू परांडे,अभिषेक लक्ष्मण राजगे, समाधान मनोहर सावंत,किरण लाला वीरकर,खाडे ओंकार सुरेश खाडे,जय शिवाजी शिंदे या खेळाडूंनी प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.
त्यांच्या निवडीबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजचे मार्गदर्शक जयसिंह शंकरराव मोहिते -पाटील,शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते- पाटील, संचालिका स्वरूपाराणी मोहिते -पाटील,सचिव अभिजीत रणवरे,सहसचिव हर्षवर्धन खराडे महाविद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय बागडे,पर्यवेक्षक राजकुमार इंगोले ,शिक्षक व शिक्षिका यांनी या खेळाडूंचे अभिनंदन केले .