निमगावात बिबट्याचा थरार… बोडरे यांच्या बकऱ्यावर केला हल्ला;हल्ल्याच्या खुणा पाहून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला दुजोरा
भूमिपुत्र न्यूज
निमगाव ता माळशिरस येथे निमगाव – मळोली रस्त्यालगत मंगळवार दि 6 जून रोजी रात्री 8.30 वा सदाशिव नारायण मिसाळ व उपसरपंच नंदकुमार पाटील यांच्या शेताजवळ वेळापूर येथील इसमास बिबट्या सदृश्य प्राणी दिसल्याने आसपासच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले.
यानंतर या बिबट्याचा वावर दिसेनासा झाल्यानंतर पुन्हा रविवार दि 18 जून रोजी हा बिबट्या निमगाव – माळोली रस्त्यालगत उपसरपंच नंदकुमार पाटील यांच्या घराच्या पूर्वेस मळोली हद्दीमधील रणनवरे यांच्या शेतात चरणाऱ्या बकऱ्यांच्या कळपावर या बिबट्याने हल्ला करून बकऱ्यास जखमी केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की , निमगाव येथील काशिनाथ बोडरे रा. 65 फाटा यांचा मुलगा किशोर बोडरे हा आपल्या मेंढराच्या कळपाला घेऊन निमगाव मळोली शिवेलगत असणाऱ्या रणनवरे यांच्या शेतात बकरे चारत असताना 18 जून रोजी दुपारी 3 ते 3.10 मिनिटांच्या दरम्यान बिबट्याने दोन वर्षे वयाच्या बकऱ्यावर हल्ला करून बकऱ्याच्या डाव्या बाजूस साधारणपणे 6 सेंटीमीटर लांबीची जखम केली.
बिबट्या पाहताच मेंढरांबरोबर असणारी कुत्री भुंकायला लागली किशोर बोडरे यांनी आरडाओरड केल्यानंतर व कुत्र्याच्या आवाजाने बिबट्या तिथून पसार झाला.यानंतर लागलीच खाजगी पशुवैद्यकीय अधिकारी यांना या ठिकाणी पाचारण करण्यात आले त्यांनी सदर बकऱ्याच्या डाव्या बाजूस असणाऱ्या त्या जखमेवर औषध उपचार करून साधारणपणे दहा टाके घेऊन जखम झाकून टाकली मात्र या परिसरात या बिबट्याच्या वावराने भीतीचे वातावरण पसरले असून 18 जून रोजी सकाळी हाच बिबट्या विश्वनाथ (बापू) नानासो मगर यांच्या शेतात वावरत असल्याच्या खुणा दिसून आल्या 6 जून रोजी च्या पायांच्या ठशावरून वन विभागाने हा प्राणी बिबट्या असल्याचे सांगून हा बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता मात्र बिबट्या त्यामध्ये अडकला नाही वन विभागाने लवकरच या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
मी रणनवरे यांच्या शेतात माझी मेंढरे चारत असताना रविवार दि 18 जून रोजी दुपारी 3 ते 3.10 च्या दरम्यान बिबट्याने माझ्या बकऱ्यावर हल्ला केला साधारणपणे मी तो बिबट्या 300 फूट अंतरावरून स्पष्ट पाहिला असून कुत्र्याचा व माझा मोठा आवाज ऐकून तो बकऱ्याला सोडून उसाच्या शेतात पळून गेला.
किशोर बोडरे, बिबट्या पाहणारा प्रत्यक्षदर्शी