माळशिरस तालुक्यात स्वाभिमानीला रणरागिनींची साथ
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी
रेखा सुरवसे
भूमीपुत्र न्यूज
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माळशिरस तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षपदी रेखा सुरवसे यांची शुक्रवार दि 17 मार्च रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली व स्वाभिमानीचे माळशिरस तालुकाध्यक्ष अजित बोरकर यांच्या नेतृत्वाखाली निवड झाली असून मा खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते रेखा सुरवसे यांना निवडीचे पत्र देण्यात आले आहे यावेळी माळशिरस तालुक्यातील अनेक महिलांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला माळशिरस तालुक्यात रणरागिणींची साथ मिळाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेची माळशिरस तालुक्यातील धार अजूनच तीव्र झाली आहे.
दूर्गा बनसोडे, मनिषा धनवटे,जया पिसे, सुनिता फाळके,शिवप्रसाद देशपांडे, शिवाजी धनवटे, समाधान घुले, दादासाहेब काळे आधी महिला व शेतकऱ्यांनी शुक्रवार दिनांक 17 मार्च रोजी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या साक्षीनं स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला
यावेळी माळशिरस तालुकाध्यक्ष अजित बोरकर, कमलाकर माने-देशमुख, मगन काळे मदनसिंह जाधव, दत्ता भोसले,साहिल आतार सचिन पवार, अभिजित गवळी,अहिल पठाण आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माळशिरस तालुक्यात अनेक राजकीय व सामाजिक संघटना कार्यरत असून महिला पदाधिकाऱ्यांची सक्षम अशी संघटना पहावयास मिळत नाही मग ती सत्ताधारी असो किंवा विरोधक मात्र स्वाभिमानीचे माळशिरस तालुका अध्यक्ष अजित बोरकर यांनी आपल्या चाणाक्ष बुद्धीने माळशिरस तालुक्यात महिलांचं संघटन जर साथीला असेल तर भविष्यात निश्चितच स्वाभिमानीला बळ मिळणार आहे हे ओळखून सक्षम महिला रणरागिनींना संघटनेत आणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला अधिकची ऊर्जा देण्याचा प्रयत्न केला आहे आगामी जिल्हा परिषद ,पंचायत समिती, बाजार समिती व सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिलांचे संघटन बळकट केल्याने सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधकांनाही स्वाभिमानीला बेरजेत धरावे लागणार आहे .