ना.चंद्रकांत दादांचे पालकमंत्री पद… अन अकलूजच्या मोहिते पाटलांची पॉवर वाढली
भूमीपुत्र न्यूज
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बारा जिल्ह्यातील सुधारित पालकमंत्री पदाची यादी बुधवार दि 4 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली. यामध्ये सोलापूरच्या पालकमंत्री पदी ना.चंद्रकांत पाटील यांची निवड झाली आणि सोलापूर जिल्ह्यातील मोहिते पाटील समर्थकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. सोलापूर जिल्ह्यातील भाजपच्या अंतर्गत गटबाजीमुळे मोहिते पाटील यांच्यावर सातत्याने शह.. काटशहचे राजकारण केले जात असल्याच्या भावना अनेक कार्यकर्त्यांनी या अगोदर बोलून दाखविल्या आहेत.या पार्श्वभूमीवर ना.चंद्रकांत दादा पाटील यांना सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळणं हे मोहिते पाटील यांच्यासाठी सोयीस्कर झाल्याचे बोलले जात आहे.
सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात सातत्याने मोहिते पाटील यांना खासदारांपासून ते पक्षीय संघटनेतील निवडी पर्यंत डावलले जात असल्याची सुप्त भावना मोहिते पाटील कार्यकर्ते व समर्थकांमध्ये होती.परंतु ना. चंद्रकांत पाटील यांच्या सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाने मोहिते पाटील यांना बऱ्याच गोष्टी साध्य करता येणार आहेत.अर्थात त्यांच्या पालकमंत्री पदाचा कार्यकाळ कमी असला तरी त्याचा सदुपयोग कसा करून घ्यायचा हे मोहिते पाटील यांना चांगलंच माहित आहे.
ना.चंद्रकांत पाटील हे मोहिते पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यापासूनच मोहिते पाटलांना सहकार्य करीत आहेत.या उपर मोहिते पाटील यांचं एम्पायर (राजकीय साम्राज्य )खूप मोठे आहे हे सातत्याने पक्षश्रेष्ठींना समजून सांगण्यात ना.चंद्रकांत पाटील हे अग्रेसर असतात आणि याच चंद्रकांत पाटलांची मोहिते पाटलांवर विशेष अशी मर्जी आहे,आणि याच मर्जीमुळे मोहिते पाटलांचे आगामी काळात पॉवर वाढेल असे राजकीय विश्लेषकांमधून बोलले जात आहे.