माळशिरस तालुकाराजकिय

संगमच्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्या जयश्री इंगळे यांचा सत्कार

भूमीपुत्र न्यूज

संगम ता माळशिरस येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्या व युवा सेनेचे जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांच्या सुविद्य पत्नी जयश्री इंगळे या प्रभाग क्रमांक 3 मधून निवडून आल्या बद्दल संगम गावचे वि का से सह सोसायटी चे मा चेअरमन आगतराव पराडे यांच्या परिवाराच्या वतीने इंगळे दांपत्याचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.गणेश इंगळे हे युवा सेनेचे सोलापूर जिल्हा प्रमुख आहेत . ते सामाजिक क्षेत्रात सतत आग्रेसर असतात .कोविड काळामध्ये गोर गरीब लोकांना मदत करणे .संगम गावातील गोर गरीब लोकांना ८४ घरगुती मीटर कनेक्शन मोफत बसवून देणे गावात प्रशासन आपल्या दारी ही संकल्पना राबवून गोर गरीब जनतेचे रेशनकार्ड , श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देणे,गावात वीज ट्रान्सफॉर्मर जळले तर तत्काळ अधिकाऱ्यांशी चर्चा करून ते लागलीच बसवून घेणे .पाण्याची समस्या असेल तर ती तत्काळ सोडवणे, रक्तदान शिबिर आदी सामाजिक उपक्रमामध्ये ते सतत अग्रेसर असतात.

यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे स्त्रीचा हात असतो या उक्तीप्रमाणे गणेश इंगळे यांच्या सुविद्य पत्नी जयश्री इंगळे यांना त्यांच्या पतीने केलेल्या कामाच मोबदला म्हणून संगम गावातील प्रभाग क्रमांक 3 मधून जनतेने त्यांना संगम ग्रामपंचायतीत विजयी केले आहे आपल्या विजयानंतर नूतन ग्रामपंचायत सदस्य जयश्री इंगळे यांनी लागलीच कामाला सुरुवात करून मतदानानंतर सर्व मतदारांचे आभार तर मानलेच परंतु आपल्या पतीच्या पावलावर पाऊल ठेवून समाज उपयोगी कार्यक्रम निश्चित राबवू असे मतदारांना आश्वासन दिले या त्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी गोरख पराडे, किरण पराडे, दत्तात्रय पराडे, गुंचाबाई पराडे, उर्मिला पराडे, आरती पराडे,आदी मान्यवर उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!