निधन वार्तामाळशिरस तालुका

विशाल उर्फ जयकुमार केचे- पाटील, लवंग25/4 यांना पितृशोक;सायंकाळी 6.00 वा होणारा अंत्यसंस्कार

भूमीपुत्र न्यूज

अखिल भारतीय मराठा महासंघाचे युवा सोलापूर जिल्हाध्यक्ष व लवंग 25/4 ता माळशिरस येथील विशाल उर्फ जयकुमार केचे पाटील यांचे पिताश्री तुकाराम केचे पाटील वय वर्ष 75 यांचे बुधवार दि 10 सप्टेंबर रोजी दुपारी 3.00 वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने अकलूज येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले.

मनमिळावू व सर्वांशी हसत खेळत बोलणारे व्यक्तिमत्व म्हणून तुकाराम केचे- पाटील यांची सर्वत्र ओळख होती त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले ,सुना, नातवंडे असा परिवार आहे त्यांच्या पार्थिवावर बुधवार दि 10 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6.00 वाजता लवंग ,25 /4 येथे त्यांच्या राहत्या घराशेजारील शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या परिवाराकडून देण्यात आली.
तुकाराम केचे पाटील यांना भूमीपुत्र न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!