माळशिरस तालुकासामाजिक

महात्मा जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 11 एप्रिल रोजी अकलूज येथे मोफत सर्व रोग निदान शिबिर

भूमीपुत्र न्यूज

महात्मा ज्योतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडी माळशिरस तालुका, माळी समाज सेवाभावी संस्था, माळशिरस तालुका व आपुलकी हॉस्पिटल अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि 11 एप्रिल रोजी जुने एसटी स्टँड ,भाजी मंडई, अकलूज येथे सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आपुलकी हॉस्पिटल अकलूज येथे मोफत सर्व रोग निदान शिबिर आयोजित केले असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे माळशिरस तालुका अध्यक्ष अभिजीत गायकवाड , ज्योती क्रांती परिषदेचे सोलापूर उपाध्यक्ष अरविंद राऊत व सुप्रसिद्ध चेस्ट फिजिशियन व आयसीयू तज्ञ डॉ. चिराग व्होरा यांनी दिली यावेळी सुनील कांबळे ,शंकर पाटील, राजेंद्र बनकर, राहुल फुले ,मनोज जगताप, अरविंद राऊत, संतोष खुडे आदी मान्यवर उपस्थित होते .

या सर्व रोग मोफत महाशिबिरात रक्तातील साखरेची मोफत तपासणी होणार असून हृदयरोग तपासणी व मोफत इसीजी होणार असून फुफुसाची मशीनद्वारे मोफत तपासणी करून तज्ञ डॉक्टरांचे मोफत मार्गदर्शन आणि उपचार याचबरोबर रक्त व लघवी तपासणीवर 50% सवलत एक्स-रे वर 30 टक्के सवलत दिली जाणार असून मोफत स्त्रीरोग तसेच अस्थिरोग निदान व मार्गदर्शन शिबिर होणार आहे कोणत्याही आजाराचे किंवा शस्त्रक्रियेची नोंदणी केल्यापासून एक महिन्याच्या आत त्याच्या उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यास हॉस्पिटल बिलावर 25 टक्के सवलत सर्व प्रकारच्या मेडिक्लेम साठी कॅशलेस सुविधा उपलब्ध असणार असल्याचीही माहिती यावेळी देण्यात आली . तरी सर्व गरजूंनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!