राजकुमार पाटील यांची भाजपच्या महाविजय 2024 साठी माढा लोकसभा व त्याअंतर्गत येणाऱ्या 6 विधानसभा क्षेत्र समन्वय पदी नियुक्ती
प्रदेशाध्यक्ष आ चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले नियुक्तीचे पत्र
भूमीपुत्र न्यूज
बोरगाव ता माळशिरस येथील तालुक्यातील भाजपचे जेष्ठ नेते राजकुमार पाटील यांची भाजपच्या महाविजय 2024 साठी माढा लोकसभा व त्या अंतर्गत येणाऱ्या 6 विधानसभा क्षेत्र निवडणूक समन्वयक पदी नियुक्ती झाली असून त्यांना बुधवार दि 2 ऑगस्ट रोजी मुंबई भाजपच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष आ चंद्रशेखर बावनकुळे व राष्ट्रीय संघटन मंत्री , महाराष्ट्राचे प्रभारी शिवप्रकाश यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र दिले यावेळी आ श्रीकांत भारती ,आ आशिष शेलार, आ प्रवीण दरेकर ,आ प्रसाद लाड यासह राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते .
राजकुमार पाटील यांनी सन 1998 साली तत्कालीन सहकार राज्यमंत्री लोकनेते प्रतापसिंह शंकरराव मोहिते पाटील यांच्या समवेत भाजपमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती सन 2000 ते 2004 या कालावधीत भारतीय जनता युवा मोर्चाची सोलापूर जिल्हाध्यक्ष, सन 2005 ते 2006 भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश सदस्य ,सन 2006 ते 2010 या कालावधीत भारतीय जनता पार्टीच्या सोलापूर जिल्हाध्यक्ष पदाची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली होती सन 2010 ते 2016 भाजपच्या प्रदेश सदस्य पद सन 2016 ते 2019 या कालावधीत सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीस पदी सन 2019 ते सन 2023 या कालावधीत ते भाजपचे प्रदेश सदस्य म्हणून कृतिशील, कार्यशील राहिले आहेत जुन्या निष्ठावान व जाणत्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला पक्षाने मोठी जबाबदारी सोपविली असून त्यांची समन्वयक पदी नियुक्ती झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे
गेल्या 26 वर्षापासून जिल्ह्यामध्ये भाजप वाढविण्यासाठी याचबरोबर सत्ता नसताना कठीण परिस्थितीतही भाजपच्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महा विजय 2024 साठी माढा लोकसभा व त्या अंतर्गत येणाऱ्या 6 विधानसभा क्षेत्रातील निवडणूक समन्वयकाची जी जबाबदारी सोपविली आहे ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न राहील यानुसार माढा लोकसभेत व त्या अंतर्गत येणाऱ्या 6 विधानसभा मतदार संघातील निवडणुका भाजपच जिंकेल व यासाठी सर्वांना विश्वासात घेऊन काम करू .
राजकुमार पाटील, माढा लोकसभा व त्या अंतर्गत विधानसभ क्षेत्र समन्वयक भाजप