पिलीव चौकातील रखडलेल्या रस्त्याच्या कामास सुरुवात; भाजपचे उद्या 1 ऑगस्टचे होणारे आंदोलन तूर्त स्थगित
भूमीपुत्र न्यूज/सतिश पारसे
म्हसवड-पिलीव-पंढरपूर महामार्गावरील पिलीव ता माळशिरस येथील मुख्य चौकातील रस्त्याचे काम रखडल्याने दळणवळणासाठी अत्यंत गैरसोय होत असल्याने १ ऑगस्ट २०२३ रोजी रास्ता रोको करण्याचा इशारा भाजप पिलीव शहर अध्यक्ष राजेंद्र करांडे यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, पुणे यांना निवेदन देऊन दिला होता,परंतु सदर रस्त्याचे काम सुरू करत असल्याचे पत्र कार्यकारी अभियंता यांनी दिल्याने १ ऑगस्ट २०२३ रोजी होणारे आंदोलन तात्पुरते स्थगित करत असल्याची माहिती सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती संग्रामसिंह जहागीरदार व भाजप पिलीव शहर अध्यक्ष राजेंद्र करांडे यांनी पत्रकारांना दिली.
यावेळी पिलीव ग्रामपंचायत सदस्या सौ.सुषमा जामदार,अविनाश जेऊरकर,विजय नागरी पतसंस्थेचे चेअरमन हनुमंत कोळी,शिवाजी इंगळे,रणधीरसिंह जामदार,समशेर रजपूत,मोहसीन शेख आदी उपस्थित होते.
महामार्गाचे काम अपूर्ण असलेमुळे त्या ठिकाणी वाहतूक कोंडी,अपघात होणे व धुळीचे प्रमाण वाढत असलेमुळे दि. ०१/०८/२०२३ रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत रास्ता रोको करणार असलेबाबत निवेदनात म्हटले होते.
त्याबाबत मरारविम,पुणे ठेकेदार व सल्लागार यांचे संदर्भिय पत्र क्र. २ व ३ अन्वये कळविले आहे की,(१) पिलीव गावातील राहिलेले काम त्वरित चालु करण्यात येईल२) काम पूर्ण होईपर्यंत बंद राहणार नाही याची काळजी घेतली जाईल.३) पिलिव गावातील जंक्शन डेव्हलपमेंट चे काम टेंडर नियमांनुसार करण्यात येईल असे पत्र महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळच्या कार्यकारी अभियंता दिपाली पोतदार यांच्याकडून आंदोलन करण्याचा निवेदन देऊन इशारा दिलेले राजेंद्र करांडे यांना मिळाले आहे.त्यामुळे दिलेल्या निवेदनानुसार रखडलेल्या रस्त्याचे काम सुरू झाल्याने व सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत तात्पुरते आंदोलन स्थगित केले असून मागण्या पूर्ण होऊन रस्त्याचे काम झाल्यास आंदोलन रद्द होईल अन्यथा पुन्हा आंदोलन छेडण्यात येईल असे संग्रामसिंह जहागीरदार व राजेंद्र करांडे यांनी सांगितले.