नातेपुते मार्केट कमिटीतील शिपायाने कार्यालयात गळफास घेऊन केली आत्महत्या

भूमीपुत्र न्यूज
नातेपुते ता माळशिरस येथील मार्केट कमिटीच्या कार्यालयात गणेश अंगद नामदास वय वर्ष 45 या शिपायाने कार्यालयातच पंख्याला दोरी लावून मंगळवार दिनांक 24 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वा च्या सुमारास आत्महत्या केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, गणेश नामदास हा नातेपुते येथील मार्केट कमिटीत गेल्या 27 वर्षापासून शिपाई व रखवालदार म्हणून काम पाहत होता मंगळवारी सायंकाळी 5. वा वाजण्याच्या सुमारास नातेपुते मार्केट कमिटीतील कार्यालयातच पंख्याला दोरी लावून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले आहे गणेश नामदास याच्या पश्चात पत्नी एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे या घटनेनंतर मार्केट कमिटी कडून नातेपुते पोलिसांना कळविल्यानंतर नातेपुते पोलिसांनी पंचनामा करून शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता गणेश नामदास यांचे पार्थिव ठेवले होते रात्री उशिरापर्यंत नामदास यांचे नातेवाईक या ठिकाणी हजर नव्हते याबाबत मार्केट कमिटी कडून पत्रकारांना माहिती देताना आडागळे यांनी सांगितले की, गणेश नामदास या शिपायाने आत्महत्या का व कशासाठी केली ? व तो या ठिकाणी कधी आला ? हे आम्ही सांगू शकत नाही कारण आम्ही सर्वजण 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीत व्यस्त होतो
गेल्या 27 वर्षापासून गणेश नामदास हा मार्केट कमिटी मध्ये शिपाई व रखवालदार म्हणून काम पाहत होता अचानक त्याने आत्महत्या का केली ? याबाबत अनेक शंका व कुशंका उपस्थित केल्या जात आहेत याबाबत पुढील तपास नातेपुते पोलिसांमार्फत केला जात आहे .




