जयसिंह मोहिते पाटील यांची 25 लाख रुपयांची फसवणूक; अकलूज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
भूमीपुत्र न्यूज
शंकरनगर, अकलूज येथील जयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांनी गुजरात येथील मेसर्स अम्युज इंजीनियरिंग राईड वलसाड मधील श्री बिरेन कांतीलाल चंपानेरी यांच्यावर अकलूज पोलीस स्टेशन येथे भारतीय दंड संहिता 1860 कलम 420 अन्वये मंगळवार दि 4 जुलै 2023 रोजी गुन्हा दाखल केला आहे .
जयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांनी अकलूज पोलीस स्टेशन येथे दिलेल्या जबाब असे म्हटले आहे की,मी जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील वय 74 वर्ष व्यवसाय शेती व व्यापार रा. शंकरनगर ता. माळशिरस जि. सोलापूर समक्ष हजर राहून फिर्यादी जबाब देतो की, मो.नं. 9960828280 मी वरील ठिकाणी कुटुंबासह राहणेस असून शेती व व्यापार करुन कुटुंबाची उपजिवीका भागवितो. मौजे आनंदनगर ता. माळशिरस येथे आमचे मालकीचे सयाजीराजे वॉटरपार्क असून माझे अधिपत्याखाली असून ते नोकरामार्फत चालवितो. त्यामध्ये नव्याने मनोरंजनाची अत्याधुनिक मनोरंजन राईडचे उपकरण बसविण्याचे असलेने मे. अम्युज इंजिनिअरगि राइड चे श्री. बिरेन कांतीलाल चंपाणेरी यांचे दरम्यान चर्चा होवून कॅरोसेल 24 (Carousul 24) हे उपकरण बसविण्याबाबत चर्चा करून सदरचे उपकरण बसविण्याचे ठरले. परंतु त्यावेळी बिरेन चंपाणेरी यांनी मला Ferris wheel (आकाश पाळणा) 100 फूटी हे उपकरण मी तुम्हाला बसवून देतो असा आग्रह केला. तेव्हा मी त्यांना म्हणालो की, तुम्ही मला Ferris wheel हे उपकरण वेळेत देवू शकणार नाही असे म्हणालो असताना देखील त्यांनी मला फसवणुक करण्याचे उद्देशाने Ferris wheel हे उपकरण दिनांक 01/02/2022 पर्यंत बसवून देतो असे आश्वासन देऊन चांगल्या प्रतीचे दोन्ही उपकरणे देण्याची हमी देवुन माझा विश्वास संपादन केल्याने Ferris wheel (आकाश पाळणा ) 100 फूटी उपकरणासाठी रक्कम रु. 45,00,000 व कॅरोसेल 24 (Carousul 24 ) उपकरणासाठी रक्कम रु. 21,00,000/- अशी एकूण रक्कम 66,00,000/- एवढया रकमेस ठरले. सदरची उपकरणे बसविण्याचा दिनांक 26/12/2022 रोजी लेखी करारनामा होवून तो दिनांक 30/01/2023 रोजी नोटरी पब्लिक यांचेसमोर नोंदवून दिला. नमूद केलेली दोन्ही उपकरणे बसविण्याचे काम 100 दिवसांत पूर्ण करण्याचा करार करुन देवून उच्चप्रतीचे मटेरियल वापरून पोहोच करुन त्यांची उभारणी करण्याचे असून त्यांचा खर्च श्री. बिरेन कांतीलाल चंपाणेरी यांनी करण्याचे ठरले होते, त्याप्रमाणे बिरेन चंपाणेरी यांनी रुपये 46,20,000/- रुपये आर.टी.जी.एस. व्दारे स्विकारले आहेत.
श्री. बिरेन चंपाणेरी यांनी आज रोजी पर्यंत फक्त कॅरोसेल 24 हे उपकरण बसवले असून मी त्यांना Ferris wheel (आकाश पाळणा) 100 फूटी उपकरण बसवणेबाबत दिनांक 31/03/2023, दिनांक 04/04/2023 आणि दिनांक 14/04/2023 रोजी ई मेलव्दारे कळवून तसेच फोनव्दारे संपर्क करण्याचा प्रयत्न करीत असता त्यांनी माझेशी संपर्क ठेवणे बंद केले असून मला कसलाही प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे माझी खात्री झाली की, श्री बिरेन कांतीलाल चंपाणेरी यांनी माझेकडून 66,00,000/- रक्कम स्विकारुन Ferris wheel (आकाश पाळणा) 100 फूटी व कॅरोसेल 24 (Carousal 24 ) अशी उपकरणे बसवून देणे आवश्यक असताना फक्त कॅरोसेल 24 (Carousul 24) बसवून देवून माझी 25,20,000/- रुपयाची फसवणुक केली आहे म्हणून माझी मे अम्युज इंजिनिअरींग राईड, वलसाड चे श्री बिरेन कांतीलाल चंपाणेरी (कंपनीचा पत्ता गोदावरी बाग, संगवी तियल कासीग, तिथल वलसाड गुजरात राज्य व रहिवाशी पत्ता- सुनिता कुंज, तिथल सेगवी नाका, गोदावरी बाग, तिथल वलसाड गुजरात 396001 याचेविरुध्द तक्रार आहे. माझा वरील संगणकावर टंकलिखीत केलेला जबाब मी वाचून पाहिला. तो माझे सांगणे प्रमाणे बरोबर व खरा आहे.
अशा आशयाची फिर्याद अकलूज पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली असून याबाबत अकलूज पोलीस स्टेशन मधील पोलीस अधिकारी अधिकचा तपास करीत आहे