युवा सेनेच्या वतीने शेवरे येथे रस्ता रोको आंदोलन ,युवा सेनेच्या आंदोलनास यश
भूमीपुत्र न्यूज
अकलूज- टेंभुर्णी रस्त्यावरील शेवरे या ठिकाणचे काम बंद पाडल्यामुळे युवा सेनेच्या वतीने शेवरे येथे रस्ता रोको आंदोलन युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे व युवा सेना जिल्हा समन्वयक किशोर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले . शेवरे गावातील अकलूज टेंभुर्णी हा रस्ता युवा सेनेच्या व शेवरे गावातील शेतकऱ्यांनी पाठ पुरावा करून रस्त्याचे काम चालू केले होते .इंदापूर तालुक्यातील काही व्यक्तींनी ते काम दोन दिवसापूर्वी बंद पाडले होते. मात्र युवा सेनेच्या व ग्रामस्थांच्या आंदोलनाचा धसका घेत प्रशासनाने हे काम तात्काळ सुरू केल्याने युवा सेनेच्या आंदोलनाला यश आल्याचे दिसून येत आहे.
या रस्ता अडवणुकीच्या प्रकारामुळे युवा सेनेच्या व शेवरे गावातील शेतकऱ्यांनी मंगळवार दि 3 जानेवारी रोजी रस्ता रोको करून आक्रमक पवित्रा घेतला व जो पर्यंत रस्त्याचे काम चालू होत नाही तोपर्यंत रस्त्यावरून उठणार नाही असा इशारा दिल्याने टेंभुर्णी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक निंबाळकर ,जोग ,लोंढे ,बबलू गाडे यांच्या मध्यस्थीने तत्काळ ते काम चालू केले . या आंदोलनास रयत क्रांती संघटनेचे विठ्ठल मस्के, सागर इंगळे, युवा सेना शहर प्रमुख शेखर खिलारे, दत्ता साळुंखे, गणेश भिताडे, गोरख मस्के, शुभम मस्के ,अण्णा ढवळे, अमीर काझी, मुन्ना माळी, सुरज तळेकर, प्रवीण झिंगे, गोविंद मिटकल ,अभय मिटकल , विनोद पराडे, शंकर पराडे ,पृथ्वी पराडे, गोटू पराडे, गोविंद पराडे ,कांतीलाल मस्के, नारायण मस्के ,दगडु मस्के ,वामन मस्के ,शहाजी मस्के ,संग्राम मस्के, सतिश मस्के ,नाना मस्के ,आबासाहेब मस्के आदी उपस्थित होते