माळशिरस तालुकासामाजिक
अकलूजच्या फार्मसी कॉलेजमध्ये मतदान नाव नोंदणी शिबीर संपन्न
भूमीपुत्र न्यूज
अकलूज शिक्षण प्रसारक मंडळच्या कॉलेज ऑफ फार्मसी व तहसील कार्यालय माळशिरस यांचे संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी मतदार नाव नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.या शिबिरात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला व नवीन मतदार म्हणून नोंदणीसाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून घेण्यात आली .
शिबिरात महाविद्यालयाचे एन.एस.एस विभाग प्रमुख प्रा.बी.एस.अंकलगी यांनी मार्गदर्शन केलें. सदर शिबिरामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.अनिल भानवसे व माळशिरस तहसिलचे नायब तहसिलदार भांडारे,यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी माळशिरस तहसिलचे कर्मचारी,शिंदे व काळकुटे यांचे सहकार्य लाभले.