माळशिरस तालुकासामाजिक
अकलूज,राऊतनगर मस्जिदमध्ये 10 मुलींचे कुराण पठण पुर्ण
भूमीपुत्र न्यूज
अकलूज राऊतनगर येथील हाजी हाफिज फतेह मोहंमद अरबी मदरसा येथे 10 मुलींनी कुराण पठण पुर्ण केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.पवित्र अशा शबे ए बारात चे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मौलाना वाहिद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली सादीया सय्यद, सुफीया बागवान,मिस्बाह शेख, आलिया सय्यद, साज बागवान,रिदा बागवान,अफरोज शेख,सबा शेख, एमन शेख,नुजहत बागवान या दहा मुलींनी कुराण पठन पुर्ण केल्याबद्दल कुराणपेटी तसेच ओढणी देऊन गौरवण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष अमीर शेख, सचिव इन्नूस तांबोळी,अकलूज अल्पसंख्याक शहर अध्यक्ष अस्लम सय्यद,सलीम सय्यद,सलिम पठाण,आलिम पठाण, अकबर शेख,शागीर सय्यद,आसिफ शेख,कदिर शेख,अस्लम मुलाणी, इब्राहिम बागवान सर आदींनी विशेष प्रयत्न केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रा. शेरखान पठाण यांनी केले