तालुकास्तरीय समुहगीत स्पर्धेत माळेवाडी (अ) जिल्हा परिषद शाळेचे यश

भूमीपुत्र न्यूज /केदार लोहकरे
पिलीव ता माळशिरस येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये तालुकास्तरीय समुहगीत गायन स्पर्धेत जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा माळेवाडी-अकलूज या संघाने उत्कृष्ट समुहगीत सादरीकरण करून माळशिरस तालुक्यात मोठ्या गटात प्रथम क्रमांक मिळविला तर छोट्या गटात तिसरा क्रमांक पटकावला आहे.या स्पर्धेत तालुक्यातील सर्व केंद्रांच्या शाळेचे संघ सहभागी झाले होते या संघाला कला शिक्षक, मुख्याध्यापक शिवलिंग नकाते यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.या समूहगीत गायन स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सेवानिवृत्त शिक्षक शंकर करडे,रामचंद्र पारसे,प्रमोद जोशी यांनी काम पाहिले.
संघाला यश संपादन करण्यासाठी जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा माळेवाडी-अकलूज येथील मुख्याध्यापक शिवलिंग नकाते,शिक्षिका सुरय्या कोरबू,तरन्नुम सय्यद,पद्मश्री थिगळे,विजय अस्वरे व सर्वच शिक्षक यांचे मोलाचे सहकार्य लाभले. गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख,वेळापूर बीटच्या विस्तारधिकारी सायरा मुलाणी,यशवंतनगर केंद्राचे केंद्रप्रमुख विठ्ठल नष्टे,शाळेचे मुख्याध्यापक शिवलिंग नकाते,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य यांनी अभिनंदन केले स्पर्धा पार पाडण्यासाठी पिलीव केंद्राचे केंद्रप्रमुख राजकुमार फासे, पिलीव जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले.




