महाराष्ट्रमाळशिरस तालुका

ऑफलाईन (पारंपारिक) पद्धतीने ग्रामपंचायतीच्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज स्वीकारणार/ तहसीलदार जगदीश निंबाळकर

भूमीपुत्र न्यूज

राज्यातील 34 जिल्ह्यातील 340 ग्रामपंचायतीमध्ये माळशिरस तालुक्यातील 35 ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुका जाहीर झाल्या असून उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात 28 नोव्हेंबर 2022 रोजी सुरू झाली असून उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 2 डिसेंबर 2022 ही आहे मात्र उमेदवारी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावेत व ऑनलाईन पद्धतीने भरलेल्या उमेदवारी अर्जाची प्रिंट काढून हा अर्ज उमेदवाराने स्वतः अथवा त्याच्या प्रतिनिधीने तहसील कार्यालय माळशिरस या ठिकाणी त्या त्या गावच्या संबंधित टेबलला भरावा अशा सूचना आहेत मात्र उमेदवारी अर्ज भरण्याची जी वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईटवर प्रचंड लोड असल्याने वेबसाईट हँग होऊन एक उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवाराला दिवसाची रात्र व रात्रीचा दिवस करून 5 ते 6 तास वेळ लागत असल्याने सर्वच उमेदवारांची दमछाक होत आहे . यामुळे ऑफलाईन म्हणजेच पारंपारिक पद्धतीने लिखित स्वरूपात ग्रामपंचायतीच्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज स्वीकारणार असल्याची माहिती माळशिरसचे तहसीलदार जगदीश निंबाळकर यांनी भूमिपुत्र न्यूज शी बोलताना दिली .

माळशिरस तालुक्यातील निमगाव, पाणीव, वेळापूर ,बागेचीवाडी ,मारकडवाडी, चांदापुरी, संगम, फळवणी, उंबरे दहिगाव, लोंढे मोहितेवाडी, मोटेवाडी (मा) ,पळसमंडळ,चौंडेश्वरवाडी, सदाशिवनगर, नेवरे ,यशवंतनगर ,आनंदनगर ,पुरंदावडे, धानोरे ,उघडेवाडी, तांबेवाडी ,खंडाळी दत्तनगर ,काळमवाडी, पिसेवाडी ,तरंगफळ ,तामशीदवाडी, इस्लामपूर ,माळेवाडी ,बोरगाव ,पठाणवस्ती कोळेगाव, कचरेवाडी ,जांभूड, गुरसाळे, मेडद ,तिरवंडी या 35 गावांच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून उमेदवारी अर्जाची छाननी 5 डिसेंबर रोजी असून उमेदवारी मागे घेण्याची तारीख 7 डिसेंबर दुपारी 3.00 वा तर त्याच दिवशी निवडणूक चिन्ह नेमून देणे व अंतिम उमेदवाराची यादी प्रसिद्ध होणार आहे व मतदान 18 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत असणार आहे मतमोजणी ही 20 डिसेंबर 2022 रोजी होणार असून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निवडणुकीत विजय झालेल्या उमेदवारांची यादी 23 डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे.

ही सर्व प्रक्रिया पार पडत असताना उमेदवारी अर्ज भरत असताना उमेदवारांना प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे दिवसा ही वेबसाईट प्रचंड लोड येऊन हँग होत आहे तर रात्री अर्ज भरतानाही संपूर्ण रात्र जागून काढावी लागत आहे यामुळे अर्ज भरण्याची प्रक्रिया अतिशय संत गतीने होत आहे तर हा भरलेला अर्ज पुन्हा तहसील कार्यालयात जाऊन जमा करावा लागत आहे ही दुहेरी कसरत उमेदवाराला करावी लागत आहे

ग्रामपंचायतीच्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरत असताना वेबसाईटवर लोड येऊन वेबसाईट हँग होत असल्याच्या तक्रारी आमच्याकडे येऊ लागल्याने निवडणूक आयोगाने यामध्ये गांभीर्याने लक्ष घालून निवडणूक पारदर्शी व्हावी यासाठी ऑफलाईन पारंपारिक पद्धतीने लिखित स्वरूपात तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत मात्र उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही 2 डिसेंबर 2022 हीच असणार आहे यामध्ये कोणत्याही पद्धतीची वाढ केलेली नाही यामुळे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी ऑफलाईन पद्धतीने जरी अर्ज भरला तरी तो स्वीकारला जाणार आहे .

जगदीश निंबाळकर, तहसीलदार माळशिरस

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!