कोळेगांव ग्रामपंचायत सरपंचपदासाठी पोटनिवडणुकीचा बिगुल;सुषमा दुपडे, अश्विनी सावंत यांचे उमेदवारी अर्ज दाखल
भूमीपुत्र न्यूज
माळशिरस तालुक्यातील कोळेगांव ग्रामपंचायतीच्या रिक्त झालेल्या सरपंचपदासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली असून, मंगळवार, ७ एप्रिल २०२६ पासून अधिकृतपणे उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुषमा धनंजय दुपडे यांनी गुरुवारी आपला सर्व जेष्ठ नेते मंडळी यांच्या उपस्थिती मध्ये अर्ज दाखला केला तर शुक्रवारी अश्विनी प्रवीण सावंत,जयश्री शशिकांत सावंत यांनी आपला अर्ज दाखल केला.
थेट जनतेतून निवडून आलेल्या तत्कालीन सरपंच सौ. रजनी प्रसाद दुपडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती.कोळेगांवच्या राजकीय वर्तुळात ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी गावातील ज्येष्ठ नेतेमंडळींकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू असल्याचे चित्र होते.
परंतु अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी झाली असून आता सरळ-सरळ लढत होण्याची चिन्हे दिसत आहेत.सोमवारी अर्ज दाखल करण्याचा अखेर चा दिवस आहे. आणखी 2 इच्छुक अर्ज दाखल करतील अशी सर्वत्र चर्चा सुरु असून प्रत्यक्ष अर्ज दाखल करतील का हे पाहणे उत्सुकाचे आहे.15 तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत किती अर्ज कायम राहतात याकडे सर्वांचे लक्ष राहिले आहे.




