माळशिरस तालुका
महसूल सप्ताह निमित्त माळशिरस तहसील कार्यालयाच्या वतीने महसूल कर्मचाऱ्यांचा गौरव समारंभ संपन्न
भूमीपुत्र न्यूज
महसूल दिनानिमित्त माळशिरस तहसील कार्यालयाच्या वतीने मंगळवार दि 1 ऑगस्ट रोजी अकलूजचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांत अधिकारी नामदेव टिळेकर यांच्या अध्यक्षतेखाली गत महसूल वर्षात उत्कृष्ट काम केलेल्या कर्मचाऱ्यांचा सन्मान व गौरव समारंभ तलाठी कार्यालय माळशिरस येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी माळशिरसचे तहसीलदार सुरेश शेजुळ व निवासी नायब तहसीलदार अमोल कदम उपस्थित होते.
याचबरोबर मंगळवार दि 1 ऑगस्ट रोजी कलम 155 अन्वये दुरुस्ती करण्यात आलेल्या आदेशाचा अंमल घेऊन दुरुस्त केलेले सातबारा व फेरफार प्रती यांचे वाटप मंडळ व गाव स्तरावर तलाठी यांच्या मार्फत करण्यात आले यामध्ये माळशिरस तालुक्यात एकूण 44 155 आदेशांतर्गत दुरुस्ती करून एकूण 104 लाभार्थ्याना लाभ देण्यात आला.