अकलूज येथील गणेश मूर्ती विक्रेत्यांचा खोडसाळपणा….
छ.शिवाजी महाराज यांच्या अवमानाबाबत अकलूज पोलीस स्टेशनला दिले पत्र
भूमीपुत्र न्यूज
अवघ्या काही तासांवर आलेल्या गणेश मूर्तींच्या प्रतिष्ठापणे अगोदर माळशिरस तालुक्यातील अकलूज आणि परिसरात वेगळ्या प्रकारच्या वादाने थैमान घातले असून याबाबत सकल मराठा समाज माळशिरस तालुक्याच्या वतीने अकलूज पोलीस स्टेशनला बहुजन प्रतिपालक, कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या होणाऱ्या अवमानाबाबत रीतसर पत्र देऊन कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे यावर प्रशासनाने योग्य ती कारवाई न केल्यास होणाऱ्या परिणाम प्रशासन जबाबदार असे असाही निर्वाणीचा इशारा देण्यात आला आहे.
अकलूज आणि परिसरात गणेश मूर्ती विक्रेत्यांकडून गणेश मूर्तीच्या शेजारी बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची छोटी मूर्ती जाणीवपूर्वक बसविली असून छत्रपती शिवाजी महाराज यांचे जाणीवपूर्वक खोडसाळपणे दैवीकरण केले जात आहे असा गंभीर आरोप करीत दहा दिवसानंतर होणाऱ्या गणेश विसर्जनाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे देखील विसर्जन केले जाणार आहे.
यामुळे बहुजन समाजाबरोबरच मराठा समाजाच्या भावना दुखविल्या गेल्या असून या गणेश मूर्ती विक्रेत्यांना अशा मूर्ती विकण्यास तात्काळ बंदी घालावी व ग्राहकांनी देखील अशा मूर्ती विकत घेऊ नये यासाठी अकलूज पोलीस स्टेशन ने खबरदारीचा उपाय म्हणून सर्व गणेश विक्रेत्यांना सक्त सूचना द्याव्यात अन्यथा समाजामध्ये तेढ निर्माण होऊन ऐन सणासुदीच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल व होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील असाही इशारा देण्यात आला आहे याचबरोबर असा जाणीवपूर्वक खोडसाळपणा करणाऱ्या विघ्नसंतोषी व्यक्तींवर तात्काळ कडक कायदेशीर कारवाई करावी असेही या पत्रात नमूद केले आहे . यावर धनाजी साखळकर,आशु ढवळे ,वल्लभ सांगडे, प्रताप चव्हाण, संतोष मगर, नंदू अंबुरे यांच्या साह्या आहेत.
या घटनेचे गांभीर्य पाहून अकलूज पोलीस स्टेशन काय कारवाई करते ? याकडे बहुजन समाजाबरोबरच मराठा समाजाचे लक्ष लागले असून अकलूज पोलिसांनी वेळीच यावर कारवाई करावी व अशा खोडसाळ व्यक्तींना जेरबंद करावे अशा समाजभावना व्यक्त होत आहेत .