माणदेशी महिला फाउंडेशनच्या रणरागिनी डॉ.सारिका सुळे यांच्या सतर्कतेने वाचले 80 मेंढ्यांचे प्राण
भूमीपुत्र न्यूज /सतीश पारसे,पिलीव
गुरुवार 6 एप्रिल 2023 वेळ सायंकाळी 6.00 वाजण्याच्या सुमारास बचेरी ता माळशिरस येथील मेंढपाळ शंकर शिंदे यांनी आपल्या मेंढ्यांना चारा म्हणून हिवराच्या झाडाच्या शेंगा टाकल्या. ऐन उन्हाळ्यात हिरवा चारा मिळाल्याने मेंढ्यांनीही तो खाल्ला मात्र त्यानंतर तासाभराने सर्व मेंढया थरथरु लागल्या. विचीत्र हावभाव करु लागल्या.यामुळे संपूर्ण शिंदे कुटुंब घाबरले. मेंढयांना नक्की काय झाले हे कुणालाही समजेना.
शिंदे कुटुंबीयांनी खाजगी तसेच सरकारी डॉक्टरांना संपर्क साधला पण कोणताही ऐनवेळी कोणताही डॉक्टर वेळेवर येईनात.शेवटी माणदेशी महीला फाऊंडेशनच्या सुळेवाडी येथील डॉ. सारिका सुळे यांना संपर्क साधला .त्यांनी रात्रीची वेळ असताना क्षणाचाही विलंब न करता शिंदे कुटुंबीयांची व्यथा लक्षात घेऊन पिलीव येथील श्रीराम मेडीकल मधुन 80 मेंढ्यांचा इलाज होईल एवढी औषधे स्वतः घेऊन शंकर शिंदे या शेतकऱ्यांच्या घरी पोहचल्या. डॉ.सारीका सुळे व वनीता सुळे यांनी तात्काळ सदर मेंढ्यांवर उपचार सुरु केले.उपचार सुरु करण्यापुर्वी ५ मेंढ्या मयत झाल्या पण दोन्ही महीला डॉक्टरांनी उपचार करुन 75 मेंढ्यांचे प्राण वाचविले.यामुळे सदर शेतकऱ्यांचे १५ ते २० लाख रुपयांचे होणारे नुकसान टळले.
पुरुष डॉक्टरांनाही लाजवेल अशी कामगीरी डॉ सारिका सुळे व वनीता सुळे या रणरागिनींनी केली असून त्यांनी तब्बल 3 तास उपचार करुन शेतकऱ्यांचे होणारे लाखो रुपयांचे होणारे नुकसान टाळले. यामुळे माणदेशी फाउंडेशन व दोन्ही डॉक्टरांचे जेवढे मानावेत तेवढे आभार कमीच आहेत असे शेतकरी व मेंढपाळ शंकर शिंदे यांनी भूमीपुत्र न्यूज शी बोलताना सांगीतले.