माळशिरस तालुका पत्रकार संघाच्या सदस्यांची महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास हजेरी
भूमीपुत्र न्यूज
माळशिरस तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी मुंबई येथील विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास भेट देऊन पाहणी केली. माळशिरसचे आ राम सातपुते यांच्या प्रयत्नातून माळशिरस तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय देशमुख ,उपाध्यक्ष शाहरुख मुलानी, पत्रकार निनाद पाटील, विनोद बाबर, उदय कदम, संजय पवार आदींसह पत्रकारांनी मुंबई येथील पावसाळी अधिवेशनास मंगळवार दिनांक 25 जुलै रोजी विधानसभा व विधान परिषदेस भेट देऊन माहिती घेतली.
यावेळी माळशिरस तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांसह सदस्यांनी राज्याचे मंत्री ना.सुधीर मुनगंटीवार,ना.हसन मुश्रीफ,ना.शंभूराज देसाई ,ना.उदय सामंत,ना.डॉ. तानाजी सावंत,ना.छगन भुजबळ याचबरोबर आ.आदित्य ठाकरे, आ.जितेंद्र आव्हाड, आ.श्रीकांत भारतीय,आ.सुनील प्रभू ,आ.राम सातपुते,आ.गोपीचंद पडळकर,आ व माजी मंत्री महादेव जानकर,आ.रोहित पवार,आ.निलेश लंके ,माजी मंत्री आ.शिवाजीराव कर्डिले ,आ अनिल परब, आ.संजय शिरसाट, आ नितेश राणे ,आ सचिन कल्याणशेट्टी ,माजी मंत्री दिलीप कांबळे,शिवतेसिंह मोहिते पाटील,डॉ.सुनील पाटील,उत्तमराव जानकर, उमेश पाटील, सुरेश पालवे , संकल्प डोळस ,सोलापूरचे माजी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर ,सोलापूर जि प चे मा सीईओ दिलीप स्वामी, ज्येष्ठ पत्रकार राजा माने आदींची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी माळशिरस तालुका पत्रकार संघाच्या कार्याचे कौतुक करून पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय देशमुख यांचे अभिनंदन केले.