रविवार 26 फेब्रुवारी रोजी निमगाव येथे राजे प्रतिष्ठानच्यावतीने निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान

भूमीपुत्र न्यूज
बहुजन प्रतिपालक, कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 393 व्या जयंतीनिमित्त निमगाव म. ( खंडोबा मंदिराच्या पाठीमागे ) ता माळशिरस येथे रविवार दिनांक 26 फेब्रुवारी 2023 रोजी सालाबाद प्रमाणे निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित केले असल्याची माहिती राजे प्रतिष्ठान व पवार तालीम चे वस्ताद गोरख पवार यांनी भूमीपुत्र न्यूज सी बोलताना दिली .

या कुस्ती मैदानात रक्कम रुपये 100 पासून ते 5 हजार रुपये किमतीच्या निकाली कुस्त्या लावल्या जातील या कुस्त्या रविवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत नेमल्या जातील व नेमलेल्या कुस्त्याच मैदानात लावल्या जातील मैदानात कोणतीही कुस्ती पैलवानास फिरवून लावली जाणार नाही उशिरा येणाऱ्या पैलवानाचा विचार केला जाणार नाही या कुस्ती मैदानात सुप्रसिद्ध कुस्ती निवेदक पैलवान युवराज केचे यांना कुस्ती क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल राजे प्रतिष्ठानच्यावतीने छत्रपती पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे .

तरी या कुस्ती मैदानास तमाम कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे असे आवाहन वस्ताद गोरख पवार यांनी केले आहे .




