माळशिरस तालुकासामाजिक

अकलूज सराफ, सुवर्णकार संघटनेच्या अध्यक्षपदी आयोध्या ज्वेलर्सचे नवनाथ (शेठ) नागणे

भूमीपुत्र न्यूज

अकलूज येथील सराफ, सुवर्णकार संघटनेच्या अध्यक्षपदी आयोध्या ज्वेलर्सचे मालक नवनाथ शेठ नागणे(मामा) यांची बिनविरोध निवड झाली असून त्यांच्या अध्यक्षतेखाली इतर कार्यकारणीच्या देखील निवडी बिनविरोध करण्यात आल्या आहेत उपाध्यक्षपदी अमेय व्होरा ,सचिव संजय महामुनी, सहसचिव स्वराज फडे, खजिनदार परीन व्होरा, सहखजिनदार मनोज शहा, कार्यकारणी सदस्य अनिल शहाणे ,पोपटराव पाटील ,किरण कपिले, मार्गदर्शक म्हणून सराफ संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुशील व्होरा , बाबुशेठ चव्हाण पाटील व माळशिरस तालुका सचिव विरेन गांधी यांची नियुक्ती करण्यात आली आहे .

अकलूज सराफ सुवर्णकार संघटनेच्या ज्या काही अडीअडचणी निर्माण होतील त्या सर्वांना विश्वासात घेऊन सोडविण्याचा प्रयत्न राहील असे आश्वासन यावेळी नूतन अध्यक्ष नवनाथ शेठ नागणे यांनी दिले यावेळी विविध मान्यवरांच्या हस्ते नवनाथ शेठ नागणे यांचा सन्मान करण्यात आला तर रोटरी क्लबचे जिल्हा संचालक व सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाउंटंट) नितीन कुदळे, सतीश कुदळे व मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष निनाद पाटील यांच्या हस्ते नवनाथ शेठ नागणे यांचा सन्मान करण्यात आला . या निवडीबद्दल नवनाथ शेठ नागणे यांचे विविध मान्यवरांकडून अभिनंदन केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!